BCCI Central Contract - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) नुकतेच केंद्रीय करार जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत संघातील अव्वल खेळाडूंना अ श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. उर्वरित खेळाडूंना ब आणि क श्रेणीत ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने या करारातून इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वगळल्याने चर्चा सुरू आहे. पण, याचा या खेळाडूंच्या आर्थिक मिळकतीवर काही परिणाम होईल, असे जाणवत नाही. कारण त्यांना आयपीएलमधून बक्कळ पैसा मिळतोय. २२ मार्चपासून आयपीएल सुरू होत असून या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला मोठी रक्कम दिली जाते. २महिने चालणाऱ्या या स्पर्धेत खेळाडू करोडो रुपयांची कमाई करतात. अशा स्थितीत केंद्रीय कंत्राटी खेळाडूंना आयपीएलमध्ये किती पैसे मिळतात?
BCCI वार्षिक करार २०२३-२४ विरुद्ध आयपीएल पगार
ग्रेड A+ ( ७ कोटी )
- रोहित शर्मा - ( मुंबई इंडियन्सकडून १६ कोटी रुपये )
- विराट कोहली - ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १५ कोटी रुपये )
- जसप्रीत बुमराह - ( मुंबई इंडियन्सकडून १२ कोटी रुपये )
- रवींद्र जडेजा - ( चेन्नई सुपर किंग्जकडून १६ कोटी रुपये)
ग्रेड A ( ५ कोटी )
- आर अश्विन - ( राजस्थान रॉयल्सकडून ५ कोटी रुपये)
- मोहम्मद शमी - ( गुजरात टायटन्सकडून ६.२५ कोटी रुपये )
- मोहम्मद सिराज - ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ७ कोटी रुपये )
- केएल राहुल - (लखनौ सुपर जायंट्सकडून १७ कोटी रुपये)
- शुभमन गिल - ( गुजरात टायटन्सकडून ८ कोटी)
- हार्दिक पांड्या - ( मुंबई इंडियन्सकडून १५ कोटी )
ग्रेड बी ( ३ कोटी )
- सूर्यकुमार यादव - ( मुंबई इंडियन्सकडून ८ कोटी रुपये )
- रिषभ पंत - ( दिल्ली कॅपिटल्सकडून १६ कोटी रुपये )
- कुलदीप यादव - ( दिल्ली कॅपिटल्सकडून २ कोटी रुपये )
- अक्षर पटेल - ( दिल्ली कॅपिटल्सकडून ९ कोटी रुपये )
- यशस्वी जैस्वाल - ( राजस्थान रॉयल्सकडून ४ कोटी रुपये)
ग्रेड क (१५ खेळाडू) - १ कोटी रिंकू सिंग - ( कोलकाता नाइट रायडर्सकडून ५५ लाख रुपये )तिलक वर्मा - ( मुंबई इंडियन्सकडून १.७ कोटी रुपये )ऋतुराज गायकवाड - ( चेन्नई सुपर किंग्जकडून ६ कोटी रुपये)शार्दुल ठाकूर - ( चेन्नई सुपर किंग्जकडून ४ कोटी रुपये )शिवम दुबे - ( चेन्नई सुपर किंग्जकडून ४ कोटी रुपये )रवी बिश्नोई - ( लखनौ सुपर जायंट्सकडून ४ कोटी रुपये)जितेश शर्मा - ( पंजाब किंग्जकडून २० लाख रुपये)वॉशिंग्टन सुंदर - ( सनरायझर्स हैदराबादकडून ८.७५ कोटी रुपये)मुकेश कुमार - ( दिल्ली कॅपिटल्सकडून ८.७५ कोटी रुपये)संजू सॅमसन - (राजस्थान रॉयल्सकडून १४ कोटी)अर्शदीप सिंग - (पंजाब किंग्जकडून ४ कोटी)के. एस. भारत- ( कोलकाता नाइट रायडर्सकडून ५० लाख)प्रसीध कृष्णा- ( राजस्थान रॉयल्सकडू १० कोटी रुपये )आवेश खान - ( राजस्थान रॉयल्सकडून १० कोटी रुपये)रजत पाटीदार - ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २० लाख रुपये )ध्रुव जुरेल* ( राजस्थान रॉयल्सकडून २० लाख रुपये) इशान किशनला मुंबई इंडियन्सकडून १५.२५ कोटी रुपये, श्रेयस अय्यरला कोलकाता नाइट रायडर्सकडून १२.२५ कोटी रुपये पगार मिळतो.