जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्यावर गेली आहे. त्यापैकी 1 लाख 26,776 लोकांना प्राण गमवावे लागले, तर 4 लाख 84,781 जणं बरे झाले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11,555 इतका झाला आहे. त्यापैकी 396 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1362 जणं बरे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 21 दिवसांनी वाढवण्याची घोषणा मंगळवारी केली. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा झाली आणि आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.
बीसीसीआयनं बोलावलेल्या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ आणि आयपीएल सीओओ हेमांग आमीन उपस्थित होते. ESPNच्या वृत्तानुसार बीसीसीआयनं सर्व फँचायझी, भागदारक आणि ब्रॉडकास्टर यांना आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. रद्द केलेली नाही, असे समजावले आहे. दुसऱ्यांदा आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी 29 मार्चला सुरू होणारी आयपीएल 14 एप्रिलपर्यंत रद्द केली होती.
आयपीएल 2020साठी बीसीसीआयनं अनेक पर्यायांचा विचार केला होता. त्यांनी ही स्पर्धा बंद स्टेडियमवर खेळवण्याचाची पर्यायाचा विचार केला. आता आयपीएलसाठी सप्टेबंर आणि नोव्हेंबरची विंडो खुली आहे. पण, ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय झाला तर.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण; Hardik Pandya, Harbhajan Singh यांनी व्यक्त केली चिंता
Shoaib Akhtar सुधरणार नाही; भारत-पाकिस्तान मालिकेवरून पुन्हा बरळला!
BCCI बेभरवशी, पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज नाही; PCB अध्यक्षांची टीका
Video : Corona Virus ला हरवून मानवतेचा वर्ल्ड कप जिंकूया; Ravi Shastriचं आवाहन
Corona Virus Lockdown : राजस्थानवरून पायी येणारा मजूर मोहम्मद शमीच्या घराजवळ चक्कर येऊन पडला अन्...