IPL 2022, Chennai Super Kings: आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) मैदानात खेळताना दिसण्याची शक्यता आता फारच कमी आहे. धोनीनंतर चेन्नईच्या संघाचं नेतृत्त्व कोण करणार असा सवाल चाहत्यांना पडला होता. पण धोनीनं आता आपला उत्तराधिकारी निवडला असल्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा संघाचं नेतृत्त्व करताना पाहायला मिळू शकतो. लवकरच आयपीएलच्या मेगा लिलावाला सुरुवात होणार आहे. त्याआधी चेन्नई सुपरकिंग्जनं रविंद्र जडेजाला कर्णधारपदी विराजमान करुन आपला फासा टाकला असल्याचं बोललं जात आहे.
चेन्नईच्या संघानं आयपीएलच्या यंदाच्या सीझनसाठी रविंद्र जडेजाला याला सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून रिटेन केलं होतं. तर आजवर चेन्नईचं नेतृत्त्व सांभाळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला दुसरं स्थान देण्यात आलं होतं. खरंतर त्याचवेळी जडेजा आता संघाचं नेतृत्त्व करणार असे संकेत मिळाले होते. पण आता चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करण्यात आलेल्या एका फोटोनं या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर धोनी आणि जडेजा यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. यात धोनी जडेजाला मिठी मारुन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असल्याचं दिसून येत आहे. या फोटोतून संघ व्यवस्थापनानं अप्रत्यक्षरित्या धोनीनंतर आता रविंद्र जडेजा संघाचं नेतृत्त्वा सांभाळणार असल्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे.
४० वर्षीय महेंद्रसिंह धोनीनं २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं अनेकदा चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या भवितव्याबाबत बोलताना काही संकेत देखील दिले होते. यात रविंद्र जडेजाकडे संघाची कमान देण्याबाबतचीही चाहुल लागली होती. दरम्यान, जडेजाकडे अद्याप संघाचं नेतृत्व करण्याचा कोणताही अनुभव नाही. चेन्नई सुपरकिंग्ज संघानं रविंद्र जडेजासाठी १६ कोटी, महेंद्रसिंह धोनी १२ कोटी, ऋतूराज गायकवाड ६ कोटी आणि मोईल अलीसाठी ८ कोटी रुपये मोजून यांना रिटेन केलं आहे.
Web Title: indian premier league 2022 mahendra singh dhoni to pick ravindra jadeja as new csk captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.