IPL 2023 Start Date : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठीचे मिनी ऑक्शन शुक्रवारी कोची येथे होणार आहे. त्यासाठी सर्व दहा फ्रँचायझींचे प्रतिनिधि केरळ येथे दाखल झाले आहेत आणि आज मॉक ऑक्शन ( लिलावाची रंगीततालिम) होणार आहे. या लिलावात ३६९ खेळाडूंवर बोली लागणार आहे. फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३६ खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. पण, ही आयपीएल सुरू कधी होणार, याची तारीखही ठरली आहे.
IPL 2023 लिलावात २० कोटींचा टप्पा पार होणार, काव्या मारन विराट कोहलीला मागे टाकणारा खेळाडू निवडणार
BCCI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०२३ एक आठवडा विलंबाने सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. फ्रँचायझीकडून मिळालेल्या अपडेट्सनुसार मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होणारी ही स्पर्धा आता १ एप्रिल २०२३ ला सुरू होईल. बीसीसीआयनेही तसं लेखी आयपीएल फ्रँचायझींना कळवले आहे. पहिली वहिली महिला आयपीएल स्पर्धा ३ मार्चपासून सुरू करण्याचा विचार बीसीसीआयचा सुरू आहे आणि त्यामुळेच पुरूष आयपीएल स्पर्धेला हा विलंब होणार आहे.
महिला आयपीएल स्पर्धा २३ दिवस चालणार असून २६ मार्चला फायनल खेळवली जाईल. ३ ते २६ मार्च अशी स्पर्धा मुंबईतच खेळवण्याचा विचार सुरू आहे. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे आणि २६ फेब्रुवारीला केप टाऊन येथे त्याची फायनल होईल. त्यानंतर आठवड्याभरातच महिला आयपीएलला सुरुवात होईल. बीसीसीआयचे महिला आयपीएलच्या मीडिया राईट्ससाठी टेंडर प्रसिद्ध केले आहेत. महिला आयपीएलसाठी प्रत्येक फ्रँचायझीसाठी बीसीसीआयला १००० कोटींचा महसूल निर्माण होण्याची आशा आहे. खेळाडूंसाठी ४० कोटी ही पर्स किंमत ठेवली गेली आहे.
- आयपीएल फ्रँचायझींनी आतापर्यंत ७४३.५ कोटी रुपये लिलावात खर्च केले आहेत
- २३ डिसेंबरला २०६.५ कोटी ८६ खेळाडूंसाठी खर्च होणे अपेक्षित आहेत
- यानंतर आयपीएल लिलावात खेळाडूंच्या पगारासाठी एकूण ९५० कोटी खर्च झालेले असतील
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Indian Premier League 2023 (IPL2023) Season 16 to start on April 1st, 1st Season of Women IPL to start from 3rd March
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.