Indian Premier League Auction 2023: 'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video

Indian Premier League Auction 2023: आयपीएल 2023च्या या लिलावात भारतीय संघातील खेळाडू अजिंक्य रहाणेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 09:15 PM2022-12-23T21:15:03+5:302022-12-23T21:20:02+5:30

whatsapp join usJoin us
Indian Premier League Auction 2023: Ajinkya Rahane reacts for the first time after Chennai Super Kings made a purchase in his team. | Indian Premier League Auction 2023: 'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video

Indian Premier League Auction 2023: 'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा मिनी लिलाव कोची येथे अजूनही सुरु आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व बेन स्टोक्स यांच्यावर आज पैशांचा पाऊस पडला. 

आतापर्यंत अनेक दिग्गज राहिले Unsold; रुट, मलान, नबी, यांचाही समावेश, पाहा संपूर्ण यादी

आयपीएल 2023च्या या लिलावात भारतीय संघातील खेळाडू अजिंक्य रहाणेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. सोशल मीडियावर रहाणेला कोणताच संघ घेणार नाही, अशी चर्चा रंगली होती. मात्र चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपल्या संघात घेतले आहे. अजिंक्य रहाणेला IPL 2022 सिझनसाठी कोलकाता नाइट राइडर्ससंघाने 1 कोटी रुपयांत विकत घेतले होते. मात्र, आयपीएल 2022 च्या 7 सामन्यांत त्याला केवळ 133 धावाच करता आल्या होत्या. आयपीएल 2022 मध्ये खराब प्रदर्शन केल्याने यावर्षी कोलकाता नाईट राइडर्सने त्याला रिलीज केले होते. आता आयपीएल 2023 सीझनच्या लिलावात रहाणेला चेन्नई सुपर किंग्सने 50 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले आहे. 

IPL २०२३ च्या लिलावाल रेकॉर्ड तोड बोली; इतिहास घडविणाऱ्या टॉप ५ खेळाडूंची यादी

चेन्नईने आपल्या संघात खरेदी केल्यानंतर अजिंक्य रहाणेने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, सर्व चेन्नईच्या चाहत्यांना माझा नमस्कार...चेन्नईच्या परिवारात सामील होताना मला खूप आनंद होत आहे. मी चेन्नईच्या संघात आणि चेपॉक मैदानात खेळण्यास खूप उत्सुक आहे, लवकरच भेटूया, असं अजिंक्य रहाणेने व्हिडिओद्वारे म्हटलं आहे. 

दरम्यान, बेन स्टोक्स पटलावर येताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी मारली. ५ कोटींची बोली लावून RCB आघाडीवर राहिले. परंतु RR ने ६.७५ कोटींपर्यंत टक्कर दिली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची एन्ट्री झाली. काव्या मारनने इथेही खेळाडूची प्राईज वाढवली. १४ कोटींसह LSG आघाडीवर होते, पण सॅम कुरनची संधी हुकलेल्या CSK ने एन्ट्री घेताना १५.२५ कोटींची बोली लावली. धोनी व स्टोक्स यापूर्वी रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून एकत्र खेळले होते. चेन्नईने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतले. 

सॅम कुरन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू-

चेन्नई सुपर किंग्स इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला आपल्या ताफ्यात घेईल असे वाटत  होतेच. सॅम कुरन ३२ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स व RCB ने बोली लावली. 6 कोटींपर्यंत दोन्ही शर्यतीत होते आणि अचानक CSK ची एन्ट्री झाली.  मुंबईनेही 9.75 कोटीपर्यंत जोर लावला अन् RRने 10 कोटींचा पॅडल उचलला.  11.5 कोटींपर्यंत RR शर्यतीत राहिले आणि CSK ने 11.75 कोटींची बोली लावली. लखनौ सुपर जायंट्सनेही 15.75 कोटींपर्यंत शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सने 18.50 कोटींत  कुरनला ताफ्यात घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Indian Premier League Auction 2023: Ajinkya Rahane reacts for the first time after Chennai Super Kings made a purchase in his team.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.