Indian Premier League Auction 2023: बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट

Indian Premier League Auction 2023 Live: बेन स्टोक्स पटलावर येताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 04:26 PM2022-12-23T16:26:52+5:302022-12-23T16:27:49+5:30

whatsapp join usJoin us
Indian Premier League Auction 2023: CSK Splurge Rs 16.25 Crore on Ben Stokes, Make Him Joint-third Costliest Buy in History | Indian Premier League Auction 2023: बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट

Indian Premier League Auction 2023: बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Auction 2023 Live: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा मिनी लिलाव कोची येथे सुरु आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व बेन स्टोक्स यांच्यावर आज पैशांचा पाऊस पडला.  

बेन स्टोक्स पटलावर येताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी मारली. ५ कोटींची बोली लावून RCB आघाडीवर राहिले. परंतु RR ने ६.७५ कोटींपर्यंत टक्कर दिली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची एन्ट्री झाली. काव्या मारनने इथेही खेळाडूची प्राईज वाढवली. १४ कोटींसह LSG आघाडीवर होते, पण सॅम कुरनची संधी हुकलेल्या CSK ने एन्ट्री घेताना १५.२५ कोटींची बोली लावली. धोनी व स्टोक्स यापूर्वी रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून एकत्र खेळले होते. चेन्नईने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतले आहे. 

पाकिस्तान संघाला लोळवलं अन् मालिकावीर ठरला; त्याच्यासाठी IPL ऑक्शनमध्ये झाली रस्सीखेच

चेन्नईच्या ताफ्यात दाखल होताच बेन स्टोक्सने एक ट्विच केलं आहे. त्या ट्विटमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा ओळखला जाणारा पिवळा रंगाचा फोटो त्यांनी ट्विटद्वारे शेअर केला आहे. 

दरम्यान, लिलावाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकसाठी चढाओढ पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स  चॅलेंजर्स बंगळुरू यांनी सुरूवातीला हॅरी ब्रुकवर बोली लावली. RR ने २.६ कोटींची बोली लावून आघाडी घेतली. ४ कोटी होताच RCB ने माघारी घेतली. ५.२५ कोटींपर्यंत बोली गेल्यावर ब्रुक RR च्या ताफ्यात जाईल असे वाटत होते, परंतु सनरायझर्स हैदराबादने उडी मारली. काव्या मारनने प्राईज पॅडल उंचावत ब्रुकची किंमत ८ कोटींच्या वर नेली. अखेर हैदराबादने १३.२५ कोटींत त्याला ताफ्यात घेतले. 

 

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा मिनी लिलाव कोची येथे सुरु आहे. या लिलावाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकसाठी चढाओढ पाहायला मिळाली.  हॅरी ब्रुकला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली. अखेर काव्या मारनने बाजी मारली आणि 13.25 कोटी रूपयांना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ब्रुकला खरेदी केले. खरं तर ब्रुकची मूळ किंमत 1.50 कोटी एवढी होती. 

मुंबई इंडियन्सने २०.५५ कोटींपैकी १७.५० कोटी एकाच खेळाडूवर उडवले; दिल्ली कॅपिटल्सने केला MI चा गेम 

सॅम कुरन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू-

चेन्नई सुपर किंग्स इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला आपल्या ताफ्यात घेईल असे वाटत  होतेच. सॅम कुरन ३२ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स व RCB ने बोली लावली. 6 कोटींपर्यंत दोन्ही शर्यतीत होते आणि अचानक CSK ची एन्ट्री झाली.  मुंबईनेही 9.75 कोटीपर्यंत जोर लावला अन् RRने 10 कोटींचा पॅडल उचलला.  11.5 कोटींपर्यंत RR शर्यतीत राहिले आणि CSK ने 11.75 कोटींची बोली लावली. लखनौ सुपर जायंट्सनेही 15.75 कोटींपर्यंत शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सने 18.50 कोटींत  कुरनला ताफ्यात घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Indian Premier League Auction 2023: CSK Splurge Rs 16.25 Crore on Ben Stokes, Make Him Joint-third Costliest Buy in History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.