जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा मिनी लिलाव कोची येथे सुरु आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व बेन स्टोक्स यांच्यावर आज पैशांचा पाऊस पडला. मात्र अनेक असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत, की ज्यांच्यावर कोणीच बोली न लावल्याने ते अनसोल्ड राहिले.
बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट देखील अनसोल्ड राहिला आहे. जो रुटची मूळ किंमत १ कोटी होती. तसेच बांगलादेश संघाचा कसोटी कर्णधार शकीब अल हसनलाही कोणत्याच संघाने खरेदी केले नाही.
IPL २०२३ च्या लिलावाल रेकॉर्ड तोड बोली; इतिहास घडविणाऱ्या टॉप ५ खेळाडूंची यादी
IPL 2023च्या लिलावात न विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी-
- जो रूट (इंग्लंड) - मूळ किंमत 1 कोटी
- राइलो रुसो (दक्षिण आफ्रिका) - मूळ किंमत 2 कोटी
- शाकिब अल हसन (बांगलादेश) - मूळ किंमत - 1.5 कोटी
- लिटन दास (बांगलादेश) - मूळ किंमत 50 लाख
- कुशल मेंडिस (श्रीलंका) - मूळ किंमत 50 लाख
- टॉम बॅंटन (इंग्लंड) - मूळ किंमत 50 लाख
- ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) - मूळ किंमत 2 कोटी
- अॅडम मिलने (न्यूझीलंड) - मूळ किंमत 2 कोटी
- अकील हुसेन (वेस्ट इंडिज) -मूळ किंमत 1 कोटी
- अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया) - मूळ किंमत 1.50 कोटी
- तबरेझ शम्सी (दक्षिण आफ्रिका) - मूळ किंमत 1 कोटी
- मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान) - मूळ किंमत 1 कोटी
- अनमोलप्रीत सिंग (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- LR चेतन (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- शुभम खजुरिया (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- रोहन कुणामल (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- हिम्मत सिंग (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- प्रियम गर्ग (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- सौरभ कुमार (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- कॉर्बिन बॉश (दक्षिण आफ्रिका) - मूळ किंमत 20 लाख
- अभिमन्यू इसवरन (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- शशांक सिंग (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- सुमित कुमार (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- दिनेश बाना (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- मोहम्मद अझरुद्दीन (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- केएम आसिफ (भारत) - मूळ किंमत 30 लाख
- लान्स मॉरिस (ऑस्ट्रेलिया) - मूळ किंमत 30 लाख
- मुजतबा युसूफ (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- चिंतल गांधी (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- मुरुगन अश्विन (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- श्रेयस गोपाल (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- सुदेश मिधुन (भारत) - मूळ किंमत 20 लाख
- पॉल स्टर्लिंग (आयर) - मूळ किंमत 20 लाख
- रॅसी व्हॅन डुसेन (दक्षिण आफ्रिका) - मूळ किंमत 2 कोटी
- शेरफेन रदरफोर्ड (WI) - मूळ किंमत 1.5 कोटी
- ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) - मूळ किंमत 2 कोटी
- मनदीप सिंग (भारत) - मूळ किंमत 50 लाख
- डेव्हिड मलान (इंग्लंड) - मूळ किंमत 1.5 कोटी
- डिरेल मिशेल (न्यूझीलंड) - मूळ किंमत 1 कोटी
- दासुन शनाका (श्रीलंका) - मूळ किंमत 50 लाख
- जेम्स नीशम (न्यूझीलंड) - मूळ किंमत 2 कोटी
- वेन पारनेल (दक्षिण आफ्रिका) - मूळ किंमत 75 लाख
- मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) - मूळ किंमत 1 कोटी
- संदीप शर्मा (भारत) - मूळ किंमत 50 लाख
- तस्किन अहमद (बांगलादेश) - मूळ किंमत 50 लाख
- दुष्मंथा चमीरा (श्रीलंका) - मूळ किंमत 50 लाख
- रिले मेरेडिथ (ऑस्ट्रेलिया) - मूळ किंमत 1.50 कोटी
सॅम कुरन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू-
चेन्नई सुपर किंग्स इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला आपल्या ताफ्यात घेईल असे वाटत होतेच. सॅम कुरन ३२ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स व RCB ने बोली लावली. 6 कोटींपर्यंत दोन्ही शर्यतीत होते आणि अचानक CSK ची एन्ट्री झाली. मुंबईनेही 9.75 कोटीपर्यंत जोर लावला अन् RRने 10 कोटींचा पॅडल उचलला. 11.5 कोटींपर्यंत RR शर्यतीत राहिले आणि CSK ने 11.75 कोटींची बोली लावली. लखनौ सुपर जायंट्सनेही 15.75 कोटींपर्यंत शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सने 18.50 कोटींत कुरनला ताफ्यात घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"