Indian Premier League Auction 2023: लिलावात मूळ किंमत २० लाख; नशीब चमकले अन् कोटींची बोली लागली, कोण आहे विव्रत शर्मा?

Indian Premier League Auction 2023: जम्मू काश्मीरचा विव्रत शर्मा देखील आयपीएलच्या या लिलावात करोडपती झाला आहे.

By मुकेश चव्हाण | Published: December 23, 2022 06:09 PM2022-12-23T18:09:10+5:302022-12-23T18:30:11+5:30

whatsapp join usJoin us
Indian Premier League Auction 2023: Jammu and Kashmir's Vivrat Sharma has also become a millionaire in this IPL 2023 auction. | Indian Premier League Auction 2023: लिलावात मूळ किंमत २० लाख; नशीब चमकले अन् कोटींची बोली लागली, कोण आहे विव्रत शर्मा?

Indian Premier League Auction 2023: लिलावात मूळ किंमत २० लाख; नशीब चमकले अन् कोटींची बोली लागली, कोण आहे विव्रत शर्मा?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा मिनी लिलाव कोची येथे सुरु आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व बेन स्टोक्स यांच्यावर आज पैशांचा पाऊस पडला.

बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट

जम्मू काश्मीरचा विव्रत शर्मा देखील आयपीएलच्या या लिलावात करोडपती झाला आहे. भारतीय संघातून अद्याप न खेळलेला (Uncapped Players) विव्रत शर्माला करोडपती होण्याची संधी मिळाली.अष्टपैलू विव्रांत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.6 कोटी रुपयांना खरेदी केले. विव्रांतची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. विव्रांत शर्मा जम्मू-काश्मीरकडून देशांतर्गत क्रिकेटचा खेळला आहे. 

IPL २०२३ च्या लिलावाल रेकॉर्ड तोड बोली; इतिहास घडविणाऱ्या टॉप ५ खेळाडूंची यादी

विव्रतसाठी पहिली बोली कोलकाता नाईट रायडर्सकडून आली आणि त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनेही बोली लावली. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती आणि दोन कोटींची बोली ओलांडूनही कोणीही मागे हटायला तयार नव्हते. तथापि, कोलकाताकडे सनरायझर्सपेक्षा कमी पैसे होते, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आणि विव्रत 2.60 कोटी रुपयांमध्ये हैदराबाद संघात दाखल झाला.

 

2021 मध्येच देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण-

23 वर्षीय विव्रत डाव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. त्याने 2021 मध्ये देशांतर्गत पदार्पण केले आणि आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेटचे त्याने तिन्ही फॉरमॅट खेळले आहे. विव्रतने आतापर्यंत खेळलेल्या नऊ टी-20 सामन्यांमध्ये 128.18 च्या स्ट्राइक रेटने 191 धावा केल्या आहेत ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत, त्याने तीन डावात सहा विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये 13 धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. विव्रतने 14 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 519 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये 22 धावांत चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 76 धावा केल्या आहेत आणि एक विकेट घेतली आहे.

दरम्यान, लिलावाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकसाठी चढाओढ पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स  चॅलेंजर्स बंगळुरू यांनी सुरूवातीला हॅरी ब्रुकवर बोली लावली. RR ने २.६ कोटींची बोली लावून आघाडी घेतली. ४ कोटी होताच RCB ने माघारी घेतली. ५.२५ कोटींपर्यंत बोली गेल्यावर ब्रुक RR च्या ताफ्यात जाईल असे वाटत होते, परंतु सनरायझर्स हैदराबादने उडी मारली. काव्या मारनने प्राईज पॅडल उंचावत ब्रुकची किंमत ८ कोटींच्या वर नेली. अखेर हैदराबादने १३.२५ कोटींत त्याला ताफ्यात घेतले. 

सॅम कुरन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू-

चेन्नई सुपर किंग्स इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला आपल्या ताफ्यात घेईल असे वाटत  होतेच. सॅम कुरन ३२ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स व RCB ने बोली लावली. 6 कोटींपर्यंत दोन्ही शर्यतीत होते आणि अचानक CSK ची एन्ट्री झाली.  मुंबईनेही 9.75 कोटीपर्यंत जोर लावला अन् RRने 10 कोटींचा पॅडल उचलला.  11.5 कोटींपर्यंत RR शर्यतीत राहिले आणि CSK ने 11.75 कोटींची बोली लावली. लखनौ सुपर जायंट्सनेही 15.75 कोटींपर्यंत शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सने 18.50 कोटींत  कुरनला ताफ्यात घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Indian Premier League Auction 2023: Jammu and Kashmir's Vivrat Sharma has also become a millionaire in this IPL 2023 auction.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.