Indian Premier League Auction 2023: पाकिस्तान संघाला लोळवलं अन् मालिकावीर ठरला; त्याच्यासाठी IPL ऑक्शनमध्ये झाली रस्सीखेच

Indian Premier League Auction 2023 Live: हॅरी ब्रुकला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 04:01 PM2022-12-23T16:01:33+5:302022-12-23T16:02:08+5:30

whatsapp join usJoin us
Indian Premier League Auction 2023: Rajasthan Royals and Sunrisers Hyderabad are in a fierce battle to sign Harry Brook. | Indian Premier League Auction 2023: पाकिस्तान संघाला लोळवलं अन् मालिकावीर ठरला; त्याच्यासाठी IPL ऑक्शनमध्ये झाली रस्सीखेच

Indian Premier League Auction 2023: पाकिस्तान संघाला लोळवलं अन् मालिकावीर ठरला; त्याच्यासाठी IPL ऑक्शनमध्ये झाली रस्सीखेच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा मिनी लिलाव कोची येथे सुरु आहे. या लिलावाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकसाठी चढाओढ पाहायला मिळाली. 

हॅरी ब्रुकला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली. अखेर काव्या मारनने बाजी मारली आणि 13.25 कोटी रूपयांना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ब्रुकला खरेदी केले. खरं तर ब्रुकची मूळ किंमत 1.50 कोटी एवढी होती. 

मुंबई इंडियन्सने २०.५५ कोटींपैकी १७.५० कोटी एकाच खेळाडूवर उडवले; दिल्ली कॅपिटल्सने केला MI चा गेम 

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स  चॅलेंजर्स बंगळुरू यांनी सुरूवातीला हॅरी ब्रुकवर बोली लावली. RR ने २.६ कोटींची बोली लावून आघाडी घेतली. ४ कोटी होताच RCB ने माघारी घेतली. ५.२५ कोटींपर्यंत बोली गेल्यावर ब्रुक RR च्या ताफ्यात जाईल असे वाटत होते, परंतु सनरायझर्स हैदराबादने उडी मारली. काव्या मारनने प्राईज पॅडल उंचावत ब्रुकची किंमत ८ कोटींच्या वर नेली. अखेर हैदराबादने १३.२५ कोटींत त्याला ताफ्यात घेतले. 

हॅरी ब्रुकने पाकिस्तानात केला होता कहर-

हॅरी ब्रुक सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या कसोटी मालिकेत त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. हॅरी ब्रुकने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकूण 468 धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन शतके आणि एक अर्धशतकही झळकावले. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडने पाकिस्तानवर ३-० असा विजय मिळवला. तसेच हॅरी ब्रुकची मालिकावीर म्हणून निवड झाली होती.

सॅम कुरन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू-

चेन्नई सुपर किंग्स इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला आपल्या ताफ्यात घेईल असे वाटत  होतेच. सॅम कुरन ३२ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. 2 कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स व RCB ने बोली लावली. 6 कोटींपर्यंत दोन्ही शर्यतीत होते आणि अचानक CSK ची एन्ट्री झाली.  मुंबईनेही 9.75 कोटीपर्यंत जोर लावला अन् RRने 10 कोटींचा पॅडल उचलला.  11.5 कोटींपर्यंत RR शर्यतीत राहिले आणि CSK ने 11.75 कोटींची बोली लावली. लखनौ सुपर जायंट्सनेही 15.75 कोटींपर्यंत शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सने 18.50 कोटींत  कुरनला ताफ्यात घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Indian Premier League Auction 2023: Rajasthan Royals and Sunrisers Hyderabad are in a fierce battle to sign Harry Brook.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.