IPL मध्ये ९४ सामने खेळवले जाणार, जगातील मोठी लीग बनणार! जाणून घ्या BCCI चा मेगा प्लान 

Indian Premier League : २००८ मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगने जगातील सर्वात मोठ्या लीगच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 04:10 PM2022-11-08T16:10:20+5:302022-11-08T16:12:46+5:30

whatsapp join usJoin us
Indian Premier League season set to expand to 94 matches in 5 years, set to becoming a global phenomenon : Chairman Arun Dhumal | IPL मध्ये ९४ सामने खेळवले जाणार, जगातील मोठी लीग बनणार! जाणून घ्या BCCI चा मेगा प्लान 

IPL मध्ये ९४ सामने खेळवले जाणार, जगातील मोठी लीग बनणार! जाणून घ्या BCCI चा मेगा प्लान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League : २००८ मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगने जगातील सर्वात मोठ्या लीगच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मागील वर्षात आयपीएलमधील संघ संख्या १० अशी झाली आणि नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. ब्रॉडकास्टींग डिल्स, खेळाडूंवर लावण्यात येणारी बोली, जागतिक व्ह्यूअर्सशीप, फ्रँचायझी पर्स या सर्व बाबतीत आता आयपीएलचा हात पकडणारी जगात एकही क्रिकेट लीग नाही. आता ही लीग आणखी उंच भरारी घेण्याची तयारी करतेय.

रोहितने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूला झापले, बिचाऱ्याने ड्रेसिंग रुममध्ये स्वतःला कोंडून घेतले अन्...


बीसीसीआयने २०२३-२०२७च्या आयपीएल प्रसारण हक्कासाठी ४८,३९० कोटींची कमाई केली. आयीएलचे नवीन चेअरमन अरुण धुमाळ यांनी आयपीएलला जगातील नंबर वन लीग बनवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. PTI शी बोलताना धुमाळ म्हणाले, "आयपीएलमध्ये आणखी प्रेक्षकवर्ग वळावा यासाठी आम्ही नवीन प्रयोग नक्कीच करण्याचा विचार करत आहोत. टीव्हीवर मॅच पाहणाऱ्यांसाठी आणि प्रत्यक्ष स्टेडियमवर येणाऱ्यांसाठी एक आणखी सुखद अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी आयपीएलच्या वेळापत्रक आधीच जाहीर केल्यास, जगभरातील लोकांना त्यानुसार प्रवास आखता येईल. त्यांच्याकडून मॅचसाठी मोजण्यात येणारा प्रत्येक पैसा वसून होईल, असा हा अनुभव असेल.''


संघ संख्या दहाच ठेवली जाणार आहे, परंतु पुढील ५ वर्षांत सामन्यांची संख्या टप्प्याटप्य्याने वाढवण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितले. २०२२मध्ये गुजरात व लखनौ हे दोन नवीन फ्रँचायाझी दाखल झाले आणि आयपीएलमध्ये ७४ सामने ( साखळी फेरीचे ७० + प्ले ऑफचे ४ ) खेळवले गेले. प्रत्येक संघाने साखळी फेरीत १४ सामने खेळले. पण, आता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या व चौथ्या वर्षी सामन्यांची संख्या १०ने वाढवण्यात येईल आणि पाचव्या वर्षी ही संख्या २० ने वाढवून ९४ इतकी केली जाईल.


- आयपीएल २०२३ - ७४ सामने
- आयपीएल २०२४ - ७४ सामने
- आयपीएल २०२५ - ८४ सामने
- आयपीएल २०२६ - ८४ सामने
- आयपीएल २०२७ - ९४ सामने


''जगभरात सुरू असलेल्या फुटबॉल व अन्य खेळांच्या लीगसोबत तुलना करणार नाही, कारण क्रिकेट वेगळा आहे. एकाच खेळपट्टीवर सहा महिने खेळले जाऊ शकत नाही,''असे धुमाळ म्हणाले. आयपीएलच्या १६व्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली असून मिनी ऑक्शनसाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्याची १५ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

Web Title: Indian Premier League season set to expand to 94 matches in 5 years, set to becoming a global phenomenon : Chairman Arun Dhumal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.