इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव संघ आहे की ज्यांनी कर्णधारपदी महेंद्रसिंग धोनीलाच कायम ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स हे संघ अनुक्रमे विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. 2013च्या आयपीएल मोसमानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबनं 11 कर्णधार बदलले आणि पुढील मोसमातही संघाची धुरा नव्या कर्णधाराकडे असेल. पण, आज आपण असे प्रसंग पाहणार आहोत की ज्यात हंगामाच्या मध्यंतरालाच कर्णधारांची उचलबांगडी झाली आहे.
राजस्थान रॉयल्सनं 2018च्या मोसमात अजिंक्य रहाणेकडे सत्राच्या मध्यंतराला संघाचे सूत्रे सोपवली होती. रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघानं प्ले ऑफपर्यंत मजल मारली. पण, एलिमिनेटरमध्ये त्यांना कोलकाता नाइट रायडर्सकडून हार पत्करावी लागली. 2019च्या मोसमात रहाणेकडे नेतृत्व सोपवले. पण, संघाला पहिल्या आठ सामन्यांत दोनच विजय मिळवता आले आणि त्यानंतर रहाणेकडून हे कर्णधारपद काढून घेतले आणि स्टीव्ह स्मिथकडे ही जबाबदारी सोपवली. पुढील मोसमात रहाणे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.
2014च्या आयपीएल लिलावापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबनं डेव्हिड मिलरला संघात कायम राखले. 2016मध्ये मिलरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. पण, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पहिल्या सहा सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आणि त्यानंतर त्याच्याकडून ही जबाबदारी काढून मुरली विजयकडे सोपवण्यात आली. पण, पुढील आठ सामन्यांत त्यांना तीनच विजय मिळवता आले. त्यानंतर 2017मध्ये पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला कर्णधारपद दिलं.
2014च्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघानं शिखर धवनला आपल्या ताफ्यात कायम राखले. त्याला पहिल्या दहा सामन्यांत केवळ एकच अर्धशतक झळकावता आले. त्यानंतर त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली आणि डॅरेन सॅमीला कर्णधार बनवलं. 2015मध्ये त्यांनी डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद दिले आणि त्याच्या नेतृत्वात हैदराबादनं 2016चं जेतेपद नावावर केलं.
Web Title: Indian Premier League, Three IPL franchises who sacked their captains mid-season
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.