यंदा ५३ दिवस रंगणार इंडियन प्रीमियर लीग

केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा; ‘विक डे’ला होणार अंतिम सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 02:58 AM2020-08-03T02:58:20+5:302020-08-03T02:58:56+5:30

whatsapp join usJoin us
The Indian Premier League will play for 53 days this year | यंदा ५३ दिवस रंगणार इंडियन प्रीमियर लीग

यंदा ५३ दिवस रंगणार इंडियन प्रीमियर लीग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : युएईमध्ये होणाऱ्या यंदाच्या आयपीएलचे सामने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होणे आता निश्चित झाले आहे. यंदा सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजल्यापासून खेळविण्यात येतील. मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची आयपीएल संचलन समितीला प्रतीक्षा आहे. ही परवानगी दोन ते तीन दिवसात मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रविवारी रात्री उशिरा आयपीएल संचालन समितीची व्हर्च्युअल बैठक संपली. आयपीएलच्या इतिहासत यंदा पहिल्यांदाच रविवारऐवजी आठवड्याच्या मधल्या दिवशी (वीक डे) आयपीएलचा अंतिम सामना रंगेल. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतिम सामना १० नोव्हेंबरला (मंगळवार) होईल. त्याचप्रमाणे यंदा सर्व सामन्यांना सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून यंदा एकूण दहा डबल हेडर सामने रंगतील. दुपारचे सामने ३.३० वाजता सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय अमिरात क्रिकेट बोर्डवर सोपविण्यात आला आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेण्यात येईल. विशेष गोष्ट म्हणजे ‘वीक डे’ला अंतिम सामना होणार आहे.
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘सामन्यांदरम्यान चांगले अंतर ठेवण्याचा प्रयत्न करताना दहा डबल हेडर सामने खेळविण्याचे ठरविले. त्यामुळेच आम्ही १० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदाच अंतिम सामना वीक डेला होईल.’ यंदाचे सामने अबुधाबी, शारजाह आणि दुबईतील मैदानांवर होणार आहेत. (वृत्तसंस्था)

च्स्पर्धेचा कालावधी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर.
च्सामने सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार.
च्स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश निषिद्ध. त्यानंतर मर्यादित प्रेक्षकांना मिळू शकतो प्रवेश.
च्कोरोना परिस्थितीमुळे खेळाडू बदलण्यासाठी संघांवर कोणतीही मर्यादा नसेल.
च्सर्व संघ २६ आॅगस्टला यूएईला होणार रवाना.

प्रायोजकांमध्ये
चिनी कंपनी कायम

आयपीएल संचालन परिषदेने रविवारी झालेल्या आपल्या बैठकीत चीनी मोबाईल कंपनीसहीत सर्व प्रायोजकांना कायम ठेवले आहे. चीनने भारताच्या हद्दीत केलेल्या घुसखोरीमुळे जूनमध्ये दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे चिनी कंपनी मुख्य प्रायोजक असलेल्या आयपीएलवर प्रश्न निर्माण झाले होते.

Web Title: The Indian Premier League will play for 53 days this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.