राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज चेतन सकारिया वडील कांजीभाई यांचं रविवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर त्यांचा लढा अयशस्वी ठरला आहे. कांजीभाई यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज पीयूष चावला ( Piyush Chawla has lost his father) याचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे कोरोनामुळे निधन झाले. पीयूषनं इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून ही माहिती दिली. मुंबई इंडियन्सही त्यांना श्रद्धांजली वाहिली. ''त्यांच्याशिवाय आता आयुष्य वेगळं असेल, ते माझे पिलर होते,''असे पीयूषनं लिहिलं.
चेतन सकारियाच्या वडिलांचं कोरोनानं निधन
राजस्थान रॉयल्सचा युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याचे वडील कांजीभाई यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर त्यांचा लढा अयशस्वी ठरला आहे. कांजीभाई यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये चेतन सकारिया यानं आपल्या चमकदार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आली. स्पर्धा थांबल्यानंतर चेतन घरी परतण्याऐवजी थेट रुग्णालयात गेला होता. आयपीएलमधून कमावलेल्या पैशातून चेतन त्याच्या वडिलांवर उपचार करत होता.
भारतीय क्रिकेटपटूवर कोसळला दुःखाचा डोंगर; कोरोनामुळे आईपाठोपाठ बहिणीचेही झाले निधन
भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू वेदा कृष्णमुर्ती हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कोरोना व्हायरसमुळे गुरुवारी तिच्या बहिण वत्सला हिचं निधन झालं होतं, दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळेच तिच्या आईचंही निधन झालं होतं. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु मागील आठवड्यात वेदाच्या आईचं आणि काही दिवसानंतर तिच्य़ा बहिणीचं निधन झालं.