विश्वचषकात पाकिस्तानला आधी 'अंडरडॉग' मानले जात होते, पण आता परिस्थिती बदलू लागली असून भारतीय संघही पाकिस्तानी संघाचा आदर करू लागला आहे असे वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी केले होते. दरम्यान, आता भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानं यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. यापूर्वी झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकिस्ताननं भारताचा पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर रमीझ राजा यांचं हे वक्तव्य समोर आलं होतं.
"भारत-पाक क्रिकेट सामना ही कौशल्य आणि प्रतिभेपेक्षाही मानसिक लढाई आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असाल, तर तुम्ही हा सामना नक्कीच जिंकू शकता. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला नेहमीच 'अंडरडॉग' मानले जात होते, पण आता भारतानेही आम्हाला आदर देण्यास सुरुवात केली आहे. याचे श्रेय पाकिस्तानला द्यायलाच हवे, कारण आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत आणि अब्जावधी डॉलर्सचा मालक असलेल्या क्रिकेट संघाला हरवत आहोत. आमच्याकडे भारतापेक्षा कमी साधने आणि सोयी आहेत, पण तरीही आम्ही त्यांच्या संघाला चांगलीच धूळ चारली आहे,” असे रमीझ राजा म्हणाले होते.
कायम्हणालाअश्विन?विरोधकांचा सन्मान करणं हे जय पराजयावर अवलंहून नसतं असं अश्विन म्हणाला. “विरोध संघाचा सन्मान करणं काही अशी गोष्ट नाही जी जय पराजयासोबत येते. आम्ही निश्चितपणे त्या पाकिस्तानी संघाचा सन्मान करतो. परंतु हे क्रिकेट आहे. शेवटी एक क्रिकेटर म्हणून आणि हा खेळ खेळणारी व्यक्ती म्हणून तुम्हाला समजते की जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे. विशेषत: टी-२० फॉरमॅटमध्ये हा फरक खूप जवळचा आहे,” असे अश्विनने एका पत्रकार परिषदेत सांगितले.