नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) सर्व संघाची घोषणा झाली आहे. 16 ऑक्टोंबरपासून होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेस आजपासून सुरूवात होत आहे. विशेष बाब म्हणजे संघातील फिरकीपटू रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) आगामी मालिकांसाठी संघात स्थान मिळाले नाही. अशातच बिश्नोईने एक भावनिक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, रवी बिश्नोईने आशिया चषकात सुपर-4 मधील पाकिस्तानविरूद्धचा सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने साजेशी कामगिरी करत 4 षटकात 26 धावा दिल्या होत्या, मात्र बळी पटकावण्यात त्याला अपयश आले होते. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतही, बिश्नोईने केवळ 3 सामन्यात एकूण 8 बळी घेत चांगली कामगिरी केली होती. तरीदेखील भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) बिश्नोईला भारतीय संघात स्थान न दिल्याने त्याने एक भावनिक पोस्ट केली आहे.
रवी बिश्नोईची भावनिक पोस्ट"सूर्य पुन्हा उगवेल, आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू", अशा आशयाची स्टोरी पोस्ट करून बिश्नोईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 22 वर्षीय युवा खेळाडूला विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत देखील जागा मिळाली नाही. खरं तर विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये रवी बिश्नोईचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक २० सप्टेंबर - मोहाली २३ सप्टेंबर - नागपूर २५ सप्टेंबर- हैदराबाद
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना