नवी दिल्ली : गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये आॅस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजविणा-या भारतीय फिरकीपटूंना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र आपल्या या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विशेष यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे विराट कोहली १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत वेगवान गोलंदाजी आक्रमणाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
आॅस्ट्रेलियाने गेल्या चार वर्षांत भारतात दोन कसोटी मालिका खेळल्या आहेत. पण आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन व डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा यांच्याविरुद्ध त्यांच्या फलंदाजांना विशेष यश मिळविता आलेले नाही. भारताने या दोन्ही मालिकांमध्ये सहज विजय मिळवला. आश्विनने यादरम्यान ८ सामन्यांत ५० आणि जडेजाने ४९ बळी घेतले. या दोघांपूर्वी हरभजन सिंग (१४ सामने ८६ बळी) आणि अनिल कुंबळे (१० सामने ६२ बळी) यांनीही मायदेशात आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवले. पण, वन-डे क्रिकेटमध्ये मात्र चित्र एकदम बदललेले दिसले. त्याचमुळे २०१३ मध्ये आश्विन व जडेजाच्या समावेशानंतरही भारताला सात सामन्यांच्या मालिकेत घाम गाळल्यानंतर ३-२ च्या फरकाने विजय मिळवता आला. कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवणा-या आश्विनने त्या मालिकेत सहा सामन्यांत ९ आणि जडेजाने तेवढ्याच लढतीत ८ बळी घेतले होते. भारताने या मालिकेत शमी व भुवनेश्वर यांच्याव्यतिरिक्त उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या अशा एकूण पाच वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे, तर फिरकीपटूंमध्ये आश्विन व जडेजा या अनुभवी जोडीऐवजी यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांसारख्या युवा फिरकीपटूंवर विश्वास दाखविला आहे. (वृत्तसंस्था)
फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाज अधिक यशस्वी ठरले. या दोन संघांदरम्यान भारतात खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या मालिकेत आर. विनयकुमार, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार आणि ईशांत शर्मा यांनी एकूण १९ बळी घेतले. कदाचित त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाने आगामी मालिकेतील पहिल्या तीन वन-डे लढतीसाठी आपली वेगवान गोलंदाजीची बाजू मजबूत केली आहे.
Web Title: Indian spinners have no achievements, performances of fast bowlers against ODIs and Australia, notable
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.