Join us  

IND vs SA : मोठी बातमी! ३ फॉरमॅटसाठी ३ कर्णधार! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 8:11 PM

Open in App

 नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी अशा तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरूवारी आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. 

भारताचा वन डे संघ -

लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर. 

भारताचा ट्वेंटी-२० संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, लोकेश राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा. 

ट्वेंटी-२० मालिका 

१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून

वन डे मालिका१७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून

कसोटी मालिका२६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मालोकेश राहुलसूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय