ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड; रहाणे बाहेर

ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्विटर खात्यावरुन ही माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 06:07 AM2017-10-02T06:07:41+5:302017-10-11T20:51:31+5:30

whatsapp join usJoin us
Indian squad for Twenty20 series against Australia; Out of Rahane | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड; रहाणे बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड; रहाणे बाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्विटर खात्यावरुन ही माहिती दिली.  निवड करण्यात आलेल्या संघामध्ये अजिंक्य रहाणेला आराम देण्यात आला आहे. तर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन झालं आहे. त्याचप्रमाणे,  उमेश यादव आणि शमी यांनाही संघातून वगळण्यात आले आहे. शिखर धवनचे टी-20 संघात पुनरागमन झालं आहे. घरच्या काही वैयक्तिक कारणामुळे वन-डे मालिकेमध्ये त्याने माघार घेतली होती.

ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 मालिकेसाठी संघात अनुभवी आशिष नेहराला संधी देण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर रोजी रांची येथे पहिला सामना होईल, 10 ऑक्टोबरला दुसरा सामना गुवाहटीत आणि तिसरा टी-20 सामना 13 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल. शिखर धवनच्या अनुपस्थित संधी मिळेलेल्या रहाणेनं पाच सामन्याच्या मालिकेत चार अर्धशतक झळकावली आहेत. त्यामुळे  अजिंक्य रहाणेला संघातून बाहेर करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे.

भारताकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थान पटकावण्याची संधी असणार आहे. कसोटीमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभव केल्याने एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यास मर्यादित षटकांच्या प्रकारातही विराटसेना अव्वल स्थानावर येण्याचा पराक्रम करेल. त्यामुळे एकाच वेळी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानावर येण्याचे विराट चॅलेंज भारतासमोर आहे. 


भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखऱ धवन, के.एल. राहुल, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एस.एस. धोनी, हार्दिक पांड्या,  कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा आणि अक्षर पटेल. 

श्रीलंकेचा दारुण पराभव केल्यानंतर मायदेशात झालेल्या पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारतानं ऑस्ट्रेलियाला 4-1नं पराभव केला. सलग तीन सामने जिंकून विजयी आघाडी घेतलेल्या भारताने बंगळुरु येथे चौथ्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी दिली. मात्र, यजमानांना २१ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला त्यामुळे आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावरुन घसरण झाली होती. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माच्या चौकार-षटकारांची आतिषबाजी बळावर कांगारुंचा सात विकेटनं पराभव करत आयसीसी क्रमवारी पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर झेप घेतली. टी-20 क्रमवारीत भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया सातव्या स्थानावर आहे. 

Web Title: Indian squad for Twenty20 series against Australia; Out of Rahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.