Indian Squad Updates vs South Africa : भारतीय संघ ३ ट्वेंटी-२०, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० मालिका खेळणाऱ्या संघातील बरेच सदस्य आफ्रिकेत पोहोचले आहेत, परंतु २ दिवसांवर पहिली मॅच असताना अजूनही प्रमुख खेळाडूंचा अतापता नाही. रविवारी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली ट्वेंटी-२० मॅच खेळवली जाणार आहे आणि ट्वेंटी-२० संघातील पहिला सामना रविवारी होणार आहे. पण, रवींद्र जडेजा अजूनही युरोप दौऱ्यावरून आफ्रिकेत दाखल झालेला नाही. त्याच्यासह संघातील आणखी काही खेळाडू आफ्रिकेत आलेले नाहीत. रवींद्र जडेजा हा ट्वेंटी-२० संघाचा उप कर्णधार आहे..
BCCI च्या सूत्रांनी सांगितले की शुबमन गिल लवकरच ट्वेंटी-२० संघात दाखल होईल आणि तो लंडनहून इथे येणार आहे. वन डे वर्ल्ड कप फायनलनंतर ( १९ नोव्हेंबर) गिल लंडनमध्ये सुट्टीसाठी गेला आहे. दीपक चहर त्याच्या कौटुंबिक कारणामुळे आफ्रिकेत आलेला नाही. त्याच्या वडिलांना बेन स्ट्रोकचा झटका आला आहे आणि चहर त्यांच्यासोबत आहे. तो आफ्रिका दौऱ्यावर जाईल की नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, बीसीसीआयने अद्याप त्याच्याजागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. चहर वन डे मालिकेतही संघाचा सदस्य आहे.
या तिन्ही खेळाडूंनी बीसीसीआयची परवानगी घेतलेली आहे. जडेजा व गिल हे दोघंही पहिल्या सामन्यापूर्वी संघात सहभागी होतील, असे वृत्त आहे. या खेळाडूंव्यतिरिक्त एसएस दास आणि सलिल अंकोला हे निवड समितीचे सदस्यही आफ्रिकेला दाखल होणार आहेत.
ट्वेंटी- २० संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
वन डे संघ - लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.
ट्वेंटी-२० मालिका
१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून
वन डे मालिका१७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून