Join us  

रिषभ पंत IPL 2024 पुनरागमन करणार; प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी फलंदाजीला येणार 

भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पुनरागमन करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 5:01 PM

Open in App

भारतीय चाहते ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे, तो दिवस २०२४ मध्ये उजाडणार आहे. भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पुनरागमन करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कर्णधाराचा डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघात झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. रिषभ पुनरागमनासाठी कठोर मेहनत घेतोय आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिषभ त्याच्या चाहत्याच्या त्याच्या प्रकृतीच्या सुधारणेचे अपडेट्स वेळोवेळी देत असतो आणि आता त्याने नेट्समध्ये थोडा थोडा सरावही सुरु केला आहे.

आयपीएल २०२४ साठी येत्या १९ डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व फ्रँचायझींनी आपापल्या ताफ्यातील रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.  दिल्ली कॅपिटल्सनेरिषभ पंत, प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल यांना रिटेन केले आहे. रिली रोसूओ, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, प्रियम गर्ग हे दिल्लीने रिलीज केलेले खेळाडू आहेत.

रिषभ जानेवारी २०२४ मध्ये भारत-अफगाणिस्तान ट्वेंटी-२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. पण, आयपीएलमध्ये त्याने खेळावे यासाठी दिल्ली कॅपिटल्सने वेगळी रणनीती आखली आहे. रिषभला ते इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर उतरवू शकतात. 

काय आहे इम्पॅक्ट प्लेअर नियम?

  • या नियमानुसार दोन्ही संघांना नाणेफेकीच्या वेळी ११ खेळाडूंसोबत ४ इतर अतिरिक्त खेळाडूंची नावं सांगावी लागतील. चार अतिरिक्त खेळाडूंमधील कुठल्याही एकाचा वापर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करता येईल. डावाच्या १४ व्या षटकापर्यंतच इम्पॅक्ट प्लेअरला मैदानात पाठवता येईल. 
  • इम्पॅक्ट प्लेअर मैदानात उतरवताना संघाचा कर्णधार, कोच, टीम मॅनेजर यांना त्याची माहिती फिल्ड अम्पायर किंवा फोर्थ अम्पायरला माहिती द्यावी लागेल. इम्पॅक्ट प्लेअर आल्यानंतर जो खेळाडू बाहेर जाईल, त्याला समन्यात पुन्हा खेळता येणार नाही. 
  • षटक संपल्यावर, विकेट पडल्यावर आणि खेळाडू जखमी झाल्यावर इम्पॅक्ट प्लेअर मैदानात उतरवता येईल. इम्पॅक्ट प्लेअर डावातील फलंदाजी आणि ४ षटके गोलंदाजी करू शकतो. मात्र कुठल्याही परिस्थितीत केवळ ११ फलंदाजांनाच फलंदाजी करता येईल. 
टॅग्स :आयपीएल २०२३रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्स