देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानातून आगामी टेस्टसाठी फिट असल्याचे दाखवून देण्यासाठी रिषभ पंत तयार आहे. दुलीप करंडक स्पर्धेत तो खेळताना दिसणार आहे. त्याआधी लोकल मॅचमध्ये त्याचा जलवा क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. कारण देशांतर्गत रेड बॉल क्रिकेटआधी रिषभ पंत दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये फटकेबाजी करताना दिसणार आहे.
दिल्ली प्रीमिअर लीग टी २० मध्ये दिसणार पंतचा जलवा!
तो पुरानी दिल्ली संघाकडून उतरणार मैदानात
रिषभ पंत पुरानी दिल्ली ६ या संघाकडून साउथ दिल्ली सुपरस्टार विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरेल. आयपीएल स्टार आयुष बदोनी हा साउथ दिल्ली संघाचा कॅप्टन आहे. ईशांत शर्माही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. पंत स्पर्धेत सहभागी व्हावा, यासाठी आयोजक उत्सुक होते. त्याच्या उपस्थितीमुळे स्पर्धेबद्दलची क्रेझ आणखी वाढेल, यात शंका नाही. संपूर्ण स्पर्धेत खेळणं शक्य नाही. पण एकच मॅच खेळेन, या अटीवर तो स्पर्धेचा शुभारंभ करून देण्यात तयार झाल्याचे समजते.
मग रेड बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी
टाईम्स ऑफ इंडियाने पंतच्या जवळच्या सूत्रांचा दाखला देत दिलेल्या वृत्तानुसार, रिषभ पंत डीपीएल टी-२० स्पर्धेतील पहिली मॅच खेळण्यासाठी तयार झाला आहे. दिल्लीतील युवा क्रिकेटर्ससाठी तयार करण्यात येणाऱ्या मंचचा हिस्सा व्हायला, पंतही उत्सुक आहे. स्पर्धेशी कनेक्ट होण्याची उत्सुकता असली तरी आगामी काळातील कार्यक्रम लक्षात घेऊनच त्याने संपूर्ण स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा केवळ एक मॅच खेळण्याची तो तयार झाला आहे. राष्ट्रीय संघाची जबाबदारीला तो पहिली पसंती देत आहे. डीपीएलमध्ये एक मॅच खेळून झाल्यावर तो रेड बॉल क्रिकेटच्या सरावासाठी सज्ज होईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही तो खेळणार आहे.