ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं एका डावात कुटलेल्या 580 धावा पाकिस्तानला दोन्ही डावांत मिळूनही करता आल्या नाही. बाबर आझमचे शतक आणि मोहम्मद रिझवानच्या 95 धावांच्या खेळीनंतरही पाकिस्तानला एक डाव व 5 धावांनी हार मानावी लागली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण, या सामन्यादरम्यान एक असा किस्सा घडला की ज्याची चर्चा संपूर्ण ऑस्ट्रेलियात सुरू आहे. त्यामागे भारतीय टॅक्सी चालक कारणीभूत आहे. ऑस्ट्रेलियात टॅक्सी चालवणाऱ्या भारतीय व्यक्तीनं पाकिस्तानच्या खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिला आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या नकार देण्यामागचं कारणही तसंच आहे आणि ते ऐकून भारतीयांना त्याचे कौतुक वाटेल.
पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 240 धावा केल्या. असाद शफिकनं सर्वाधिक 76 धावा करताना पाकिस्ताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क ( 4/52), पॅट कमिन्स ( 3/60) आणि जोश हेझलवूड ( 2/46) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियानं पाक गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. डेव्हिड वॉर्नरनं 296 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीनं 154 धावा कुटल्या. जोस बर्नचे शतक तीन धावांनी हुकलं. त्यानं 166 चेंडूंत 10 चौकारांसह 97 धावा केल्या. पण, या सामन्यात भाव खाल्ला तो मार्नस लॅबुश्चॅग्नेनं... त्यानं कसोटीतील पहिले शतक झळकावताना 185 धावांची खेळी केली. 279 चेंडूंत त्यानं 20 चौकार मारले. मॅथ्यू वेडनं 60 धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाला 580 धावांपर्यंत मजल मारून दिली.
ऐका किस्सा....