सुनील गावसकर लिहितात...
आता दौ-याच्या अखेरच्या लढतीबाबत उत्सुकता आहे. न्यूलँडमध्ये खेळल्या जाणा-या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व गाजवले तर दौरा यशस्वी ठरला, असे भारतीय संघाला वाटेल. सेंच्युरियनमध्ये दुसºया लढतीत विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी केली. त्यांच्यासाठी या लढतीतील केवळ विजय महत्त्वाचा नसून एकदिवसीय लढतीत वर्चस्व गाजवणाºया यजुवेंद्र चहलला त्यांनी ज्या पद्धतीने हाताळले त्याचा त्यांना पुढच्या लढतीत नक्कीच लाभ होईल. सेंच्युरियन व जोहान्सबर्गमधील खेळपट्ट्या संथ आहेत. चहलने चेंडूला उंची दिली तरी टप्पा पडल्यानंतर चेंडू अधिक संथ होत होता. त्यामुळे क्लासेनने खेळपट्टीच्या खोलीचा लाभ घेत पुलचे फटके खेळले किंवा पुढे सरसावत चेंडूला स्टँडमध्ये भिरकावले. क्लासेनला ड्युमिनीची चांगली साथ लाभली. भागीदारीदरम्यान ड्युमिनीने क्लासेनला अधिक स्ट्राईक मिळेल, याची खबरदारी घेतली. दुसºयांदा चहल महागडा ठरल्यामुळे न्यूलँड्मध्ये खेळल्या जाणाºया लढतीत अक्षर पटेलला संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. या महिन्याच्या सुरुवातीला खेळल्या गेलेल्या एकदिवसीय लढतीप्रमाणेच खेळपट्टी जर पाटा असेल तर शनिवारी खेळल्या जाणारी लढतही मोठ्या धावसंख्येची होण्याची शक्यता आहे.
धावफलकावर अर्धशतक झळकावण्यापूर्वीच तीन फलंदाज गमावले आहेत, असे भारतीय संघाबाबत वारंवार घडत नाही. कोहली एका अप्रतिम चेंडूवर बाद झाला. प्रतीक्षा करीत असलेल्या मनीष पांडेने मिळालेल्या संधीचा लाभ घेतला. धोनीच्या क्षमतेवर शंका उपस्थित करणाºयांना त्याने आक्रमक फटकेबाजी करीत गप्प केले. पांडे व धोनी यांनी जवळजवळ शतकी भागीदारी केल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारता आली. भारत या धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी ठरला, त्याचे श्रेय दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना द्यायलाच हवे.
दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान तुरळक पाऊस असतानाही खेळ सुरू ठेवण्याच्या निर्णय घेणाºया पंचांचीही प्रशंसा करायला हवी. स्टेडियम हाऊसफुल होते आणि सामना पूर्ण झाल्यामुळे शेवटी प्रेक्षक समाधानाने घरी परतले. चेंडू ओला होत असल्यामुळे आम्हाला त्याची झळ बसली. गोलंदाजांना अचूक मारा करता आला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीचीही सामना सुरू ठेवण्यासाठी प्रशंसा करायला हवी. टी-२० क्रिकेटमध्ये निखळ मनोरंजन आहे. त्यामुळे तुरळक पावसामुळे
खेळ थांबयला नको. पाच
दिवसाचा कसोटी सामना असता तर वेगळी बाब असती. कारण पावसामुळे खेळपट्टीचे स्वरुप बदलण्याची शक्यता असते.
विजय मिळवणाºया दक्षिण आफ्रिका संघाचे अभिनंदन पण, त्यापेक्षा खेळ न थांबविण्याचा निर्णय घेणारे पंच व भारतीय संघ अधिक अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तिकिटांचे पैसे वसूल झाल्याचे समाधान लाभले. (पीएमजी)
Web Title: The Indian team and the punch-tainted character
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.