मुंबई: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेतून कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माआशिया चषक स्पर्धेत संघाचं नेतृत्त्व करेल. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनकडे असेल. वेगवान गोलंदाज खलील अहमद या संघातील नवा चेहरा आहे. 15 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होईल. 18 सप्टेंबरला भारताचा स्पर्धेतील पहिला सामना होईल.विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यानं या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. तर शिखर धवन उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची जबाबदारी या दोघांसह के. एल. राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांच्यावर असेल. भारतीय गोलंदाजीची धुरा फिरकीपटू कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद यांच्या खांद्यावर असेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Asia Cup 2018: भारतीय संघ जाहीर; विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा नेतृत्त्व करणार
Asia Cup 2018: भारतीय संघ जाहीर; विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा नेतृत्त्व करणार
शिखर धवनकडे संघाचं उपकर्णधारपद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 1:19 PM