भारतीय संघाने आशिया कपमध्ये जोरदार कामगीरी केली. श्रीलंकेचा डाव ५० धावात गुंडाळत विजय मिळवला. आता भारतीय संघाला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वचषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली. आता बीसीसीआयनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियन मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला विश्रांती दिली. केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर जडेजाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन, अश्विन, मोहम्मद जवेंद्र, बी. शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियन संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशॅग्ने, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, एडम जाम्पा.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना २४ सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये होणार आहे. यानंतर मालिकेतील शेवटचा सामना २७ सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ विश्वचषक खेळणार आहे. विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.
मालिकेचे वेळापत्रक-
पहिली वनडे - २२ सप्टेंबर - मोहाली दुसरी वनडे - २४ सप्टेंबर - इंदूर तिसरी वनडे - २७ सप्टेंबर - राजकोट