Join us  

केपटाऊनमध्ये भारतीय संघ घामेघूम, पण दोनच मिनिटांत आंघोळ उरकरण्याचा आदेश

दक्षिण आफ्रिका दौ-यावर असणारे भारतीय संघाचे खेळाडू कसून सराव करत असून घाम गाळत आहेत, मात्र त्यांना आंघोळीसाठी फक्त दोन मिनिटांचा वेळ दिला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 1:19 PM

Open in App
ठळक मुद्देकेपटाऊन सध्या दुष्काळचा सामना करत आहेत्यामुळे भारतीय संघाला आंघोळीसाठी फक्त दोन मिनिटांचा वेळ दिला गेला आहेपाणी वाचवण्यासाठी एका व्यक्तीला दिवसाला फक्त 87 लीटर पाणी देण्याची परवनागी स्थानिक प्रशासनाने दिली आहे

केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर असणा-या भारतीय क्रिकेट संघाला मालिका सुरु होण्याआधीच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यावर असणारे भारतीय संघाचे खेळाडू कसून सराव करत असून घाम गाळत आहेत, मात्र त्यांना आंघोळीसाठी फक्त दोन मिनिटांचा वेळ दिला जात आहे. केपटाऊन सध्या दुष्काळचा सामना करत असल्या कारणाने असं करण्यास सांगण्यात आलं आहे. पाणी वाचवण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी वाचवण्यासाठी एका व्यक्तीला दिवसाला फक्त 87 लीटर पाणी देण्याची परवनागी स्थानिक प्रशासनाने दिली आहे. केपटाऊनमधील पाणी समस्या इतकी गंभीर झाली आहे की, पाण्याचा स्तर अत्यंत खालावला आहे. ही खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे. 

स्थानिक निवासी निसियांनी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 'पाण्याची कमतरता असताना केपटाऊनमध्ये दोन्ही संघांदरम्यान कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशावेळी इतर गोष्टींशी तुलना करता पाण्याची जास्त चिंता असली पाहिजे. पण खेळासाठी असं करणं कठीण आहे'. तेथीलच अजून एक नागरिक सब्बीर हर्नेकर यांनी लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी लोकांना आपल्यासोबत पाण्याच्या बाटल्या आणि कॅन घेऊन येण्याचा सल्ला दिला आहे. तेथीलच एका दांपत्याने पाण्याची समस्या इतकी मोठी आहे की, लांबून पाणी आणावं लागतं असं सांगितलं आहे. 

मिळालेल्या रिपोर्टनुसार, केपटाऊनशी संबंधित एका अधिका-याची पिण्यायोग्य असणा-या पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या वापरावर नजर असते. येथे पाणी लेव्हल 6 वर पोहोचलं आहे. याचा अर्थ पाण्याचा वापर रोपटी, पूल आणि इतर कामांसाठी केला जाऊ शकत नाही. जर एखाद्या नागरिकाने आदेशाचं पालन केलं नाही तर एक लिटर पाण्यासाठी जवळपास 51 हजारांचा दंड ठोठावण्यात येतो. 

एकीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना भारतीय संघासाठी मात्र एक खुशखबर आहे. पाण्याच्या कमतरतेचा प्रभाव खेळपट्टीवर पहायला मिळणार आहे ज्याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका