Join us  

सुर्यकुमार यादवच्या 'यशा'ची रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वीच केली होती भविष्यवाणी; ट्विट व्हायरल

सुर्यकुमारच्या या वादळी खेळीनंतर सध्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचं २०११ मधील ट्विट व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 3:42 PM

Open in App

नवी दिल्ली- भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवचे टी-२० क्रिकेटमधील दुसरे झंझावाती शतक आणि दीपक हुडाची शानदार फिरकी या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार यादव मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला.

'आम्ही टी-२० संघासाठी नवा कर्णधार निवडतोय'; बीसीसीआयची चर्चा, रोहित शर्माने काय उत्तर दिलं, पाहा!

सुर्यकुमारच्या या वादळी खेळीनंतर सध्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचं २०११ मधील ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये रोहितने सुर्यकुमारची स्तुती केली आहे. चेन्नईमध्ये बीसीसीआय पुरस्कार सोहळा पार पडला. भविष्यात काही मनोरंजक क्रिकेटपटू असणार आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादव हा भविष्यात पाहण्यासारखा खेळाडू असेल. आता चाहते रोहितचं ट्विट रिट्विट करून त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

सूर्यकुमार यादवने भारताच्या १९१ धावांपैकी १११ धावा चोपल्या. कॅलेंडर वर्षातील त्याचे हे ट्वेंटी-२०तील दुसरे शतक ठरले आणि रोहित शर्मा ( १०२८) याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी नेपियर येथे रंगणार आहे. 

दरम्यान, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने सूर्यकुमारच्या शतकी तडाख्याच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १९१ धावा उभारल्या. सूर्याने केवळ ४९ चेंडूत शतक झळकावताना ४१ चेंडूत ११ चौकार व ७ षटकरांसह नाबाद १११ धावा कुटल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये दोन शतके झळकावणारा सूर्या हा रोहित शर्मा आणि लोकेश राहुल नंतर तिसरा भारतीय ठरला. या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १८.५ षटकांत केवळ १२६ धावांत संपुष्टात आला. पर्यायी फिरकी गोलंदाज दीपक हुडा याने २.५ षटकांत केवळ १० धावांमध्ये ४ बळी घेतले. त्याने १९ व्या षटकात तीन बळी घेत यजमानांचा डाव संपुष्टात आणला.

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्माबीसीसीआय
Open in App