भारतीय संघ पूर्णपणे सज्ज

मुंबईत होणा-या त्रिकोणीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज असून आम्ही अतिआत्मविश्वास बाळगलेला नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:17 AM2017-08-18T05:17:10+5:302017-08-18T05:17:10+5:30

whatsapp join usJoin us
The Indian team is fully equipped | भारतीय संघ पूर्णपणे सज्ज

भारतीय संघ पूर्णपणे सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : मुंबईत होणा-या त्रिकोणीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज असून आम्ही अतिआत्मविश्वास बाळगलेला नाही. आम्ही एकावेळी एकाच सामन्याचा विचार करुन आगेकूच करु, असे भारताचा स्टार विंगर जॅकीचंद सिंग याने सांगितले.
मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये झालेल्या सराव सत्रानंतर जॅकीचंदने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. १९ आॅगस्टला होणाºया पहिल्या सामन्यात भारतीय संघ मॉरिशसविरुद्ध खेळेल. यानंतर २४ आॅगस्टला भारताची लढत सेंट किट्स आणि नेविस विरुद्ध होईल. ५ सप्टेंबरला होणाºया आशिया एएफसी कप पात्रता स्पर्धेतील मकाऊविरुध्दच्या लढतीची पुर्वतयारी म्हणून भारतीय संघ या स्पर्धेत
खेळेल.
जँकीचंद याने म्हटले की, ‘आम्ही त्रिकोणीय स्पर्धेसाठी सज्ज असून आम्हाला अतिरिक्त दबावापासून दूर रहावे लागेल. दिवसागणिक आमच्या खेळामध्ये सुधारणा होत असून कामगिरीत सातत्य ठेवण्यात यश येत आहे. आम्ही निश्चित अतिआत्मविश्वासू नाही, परंतु आम्ही एकावेळी एकाच सामन्याचा विचार करुन आगेकूच करु.’
प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाइन यांनी नेहमीच संघात युवा खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे अंतिम संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा लागल्याचे
मत जॅकीचंदने व्यक्त केले.
याबाबतीत तो म्हणाला की, ‘प्रत्येक खेळाडू अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत
आहे. यासाठी आमची एकमेकांविरुद्ध स्पर्धा सुरु आहे. पण ही स्पर्धा आम्ही खुलेपणाने करु शकत नाही. जर, सराव सत्रामध्ये अधिक मेहनत केली आणि चांगले प्रदर्शन केले, तर नक्कीच अंतिम संघात स्थान मिळेल, याची आम्हाला जाणीव आहे.’
गेल्याकाही सामन्यांमध्ये भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. याचे श्रेय प्रशिक्षक कॉन्स्टेनटाइन यांना देताना जॅकीचंद म्हणाला की, ‘गेल्या काही काळापासून संघाची कामगिरी नक्कीच शानदार होत आहे. हे सर्व प्रशिक्षक आणि टेÑनर्स यांच्यामुळेच शक्य झाले आहे. सर्व खेळाडू सांघिक भावनेतून प्रदर्शन करत आहेत आणि मला वाटते त्यामुळेच आम्ही मजबूत संघ बनत आहोत.’
त्याचप्रमाणे, ‘त्रिकोणीय मालिकेसाठी संघाला पुर्णपणे तयार करण्यासाठी प्रशिक्षकांनी आम्हाला मॉरिशस तसेच सेंट किट्स आणि नेविस या संघाच्या व्हिडिओही दाखवल्या आहेत. आम्ही प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार कामगिरी करत असून याचा निश्चितच आम्हाला फायदा होईल.’ असेही जॅकीचंदने यावेळी म्हटले.
>मेहनत घेत आहेत
संघातील युवा खेळाडूही चांगले प्रदर्शन करत आहेत. जेरी लालरीनझुआला आणि उदांता सिंग सारख्या खेळाडूंनी आपली छाप पाडली असून ते नेहमी सिनिअर्स खेळाडूंकडून टीप्स घेत असतात. एखाद्या क्लब आणि राष्ट्रीय संघातून खेळण्याचा नेमका फरक त्यांना सिनिअर्सकडून शिकण्यास मिळत आहे. भारतीय संघ समतोल असून तंदुरुस्ती टिकवण्यासाठी प्रशिक्षक, टेÑनर्स आणि डॉक्टर कठोर मेहनत घेत आहेत.
- जॅकीचंद सिंग

Web Title: The Indian team is fully equipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.