त्रिनिदाद : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. पहिल्या दोन्हीही सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ विंडीजला क्लिन स्वीप देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेस्टइंडिजचा संघ आज आपल्या अस्तित्वासाठी मैदानात उतरेल कारण भारताने २ सामने जिंकून मालिकेवर कब्जा केला आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होईल.
भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवून वेस्टइंडिजच्या धरतीवर इतिहास रचण्याची संधी असेल. कारण भारतीय संघाने आतापर्यंत एकदाही विंडीजला त्यांच्या धरतीवर एकदिवसीय मालिकेत क्लिन स्वीप केले नाही. यापूर्वी कोणत्याच भारतीय कर्णधाराला हा कारनामा करण्यात यश आले नाही त्यामुळे शिखर धवनला आपल्या नेतृत्वात इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
भारतीय संघ रचणार इतिहास?
यापूर्वी भारतीय संघाने वेस्टइंडिजच्या भूमीवर ९ एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, ज्यातील चार मालिका वेस्टइंडिजने तर पाच मालिका भारताने जिंकल्या आहेत. भारतीय संघाने २०१७ मध्ये ३-१ ने मालिका जिंकून सर्वोत्तम कामगिरी केली होती. भारतीय संघाने तब्बल ३९ वर्षांपूर्वी आपली पहिली मालिका विंडीजच्या धरतीवर खेळली होती.
वेस्टइंडिजमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिका
१९८३ वेस्टइंडिज २-१ ने विजयी
१९८८-८९ वेस्टइंडिज ५-० ने विजयी
१९९६-९७ वेस्टइंडिज ३-१ ने विजयी
२००२ भारत २-१ ने विजयी
२००६ वेस्टइंडिज ४-१ ने विजयी
२००९ भारत २-१ ने विजयी
२०११ भारत ३-२ ने विजयी
२०१७ भारत ३-१ ने विजयी
२०१९ भारत २-० ने विजयी
२०२२ भारत २-० ने आघाडीवर
वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्ड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
Web Title: Indian team has a chance to create history by winning the third ODI against West Indies today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.