नवी दिल्ली : आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2022) भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) कोरोना संक्रमित (Corona Positive) असल्याचे समोर आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघ आजच यूएईला रवाना होणार आहे. आशिया चषकाचा थरार २७ ऑगस्टपासून रंगणार असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहे. तर रविवारी २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.
व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत होणार रवाना
राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत आशिया चषकात संघासोबत उपस्थित राहणे त्याच्यासाठी खूप कठीण जाऊ शकते. जोपर्यंत तो त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह येत नाही आणि तो तंदुरुस्त होत नाही तोपर्यंत तो संघासोबत जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आशिया कपमध्ये राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत रवाना होईल असे बोलले जात आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
Web Title: Indian team head coach Rahul Dravid has been found corona positive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.