Women's T20 Asia Cup 2022: महिला आशिया चषकात भारतीय महिला संघाचे वर्चस्व; जाणून घ्या पॉइंट टेबल 

महिला आशिया चषकाच्या गुणतालिकेत भारतीय संघ 3 विजयासह अव्वल स्थानावर आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 01:22 PM2022-10-06T13:22:27+5:302022-10-06T13:23:12+5:30

whatsapp join usJoin us
Indian team is at the top position in Women's Asia Cup points table with 3 wins | Women's T20 Asia Cup 2022: महिला आशिया चषकात भारतीय महिला संघाचे वर्चस्व; जाणून घ्या पॉइंट टेबल 

Women's T20 Asia Cup 2022: महिला आशिया चषकात भारतीय महिला संघाचे वर्चस्व; जाणून घ्या पॉइंट टेबल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिल्हेट : बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. लीग टप्प्यातील सामने 1 ते 11 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जात आहेत, ज्यामध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्या संघाचा 15 ऑक्टोबरला अंतिम सामना होईल.

दरम्यान, स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ सध्याच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाने सर्वाधिक 6वेळा आशिया चषकाचा किताब पटकावला आहे. भारताने स्पर्धेतील आपले सलामीचे तिन्ही सामने जिंकून एकतर्फी वर्चस्व राखले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, त्यांनी 3 सामन्यांमधील 2 सामने जिंकले आहेत. थायलंडच्या संघाने गुरूवारी पाकिस्तानच्या संघाचा पराभव करून इतिहास रचला आहे. तर मलेशियाच्या संघाला अद्याप विजयाच्या खाते उघडता आले नाही. 

भारतीय संघाचे वर्चस्व 

स्थान संघ सामने विजयपराभवगुण
1भारत 3306
2पाकिस्तान3214
3श्रीलंका3214
4बांगलादेश 2112
5थायलंड 3222
6यूएई3222
7मलेशिया3030


7 संघांमध्ये रंगतोय 'सामना' 
1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील 2 आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. त्यामुळे किताबासाठी सात संघ आमनेसामने असणार आहेत.  

 

Web Title: Indian team is at the top position in Women's Asia Cup points table with 3 wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.