मुंबई : विश्वचषकात भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार, अशा चर्चांना सुरुवात झाली होती. पण तसे घडले मात्र नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला निवृत्ती घेण्यापासून भारतीय संघानेच थांबवलं, असे म्हटले जात आहे.
भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांनी संघाबाबत काही रणनीती बनवली आहे. रिषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आले असले तरी तो जायबंदी झाला तर काय करायचे, हे प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे पडलेला आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेट विश्वचषक येत्या काही महिन्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात जर पंत दुखापतग्रस्त झाला तर निवड समितीपुढे धोनीसारखा पर्याय असेल. त्याबरोबर धोनीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे धोनीने संघाचा मार्गदर्शक म्हणून का पाहावे, असेही संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने धोनीला निवृत्ती घेण्यापासून परावृत्त केले आहे.
धोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...मुंबई : विश्वचषकानंतर महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटपासून दोन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी या दोन महिन्यांमध्ये भारतीय सैन्याबरोबर सराव करणार आहे. पण धोनीने क्रिकेटपासून फक्त दोन महिनेच लांब राहण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न तुम्हाला का पडला नाही.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी विश्वचषकानंतर दोन महिने विश्रांती घेणार असल्याची चर्चा होती. पण धोनी विश्रांती घेणार नसून आपल्या भारतीय आर्मीबरोबर काम करणार असल्याचे म्हटले जात होते. पण धोनी सैन्यात जाऊन नेमके करणार काय, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. पण आता तर लष्करानं माहीचा प्लान सांगितला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन मालिका खेळवण्यात येणार आहेत. या मालिका ऑगस्टमध्ये संपणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात परत येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर अनुक्रमे बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्याबरोबर भारताचे सामने होणार आहेत. त्यामुळे हे सामने खेळण्यासाठी धोनी दोन महिने क्रिकेटपासून लांब राहीला असल्याचे म्हटले जात आहे.