Join us  

भारतीय संघाने गमावले कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान

नव्या क्रमवारीनुसार आता ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले असून भारतीय संघाची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:27 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी नवी क्रमवारी जाहीर केली आणि यानुसार भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमधील आपले अव्वल स्थान गमवावे लागले. नव्या क्रमवारीनुसार आता ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले असून भारतीय संघाची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच न्यूझीलंड संघाने दुसरे स्थान मिळवले आहे. त्याचवेळी आॅस्टेÑलियाने टी२० क्रिकेटमध्येही अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. सुमारे चार वर्षांनंतर भारताने कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान गमावले.आयसीसी क्रमवारी नियमानुसार वार्षिक क्रमवारी जाहीर करताना यामध्ये २०१६-१७ सालच्या कामगिरीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारताची तिसºया स्थानी घसरण झाली असून, २०१६ सालानंतर भारताला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमधील पहिले स्थान गमवावे लागले. त्याचवेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थान मात्र भारताने अद्याप कायम राखले आहे.२०१६-१७ या सत्रामध्ये भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये होता आणि यादरम्यान भारताने १२ कसोटी सामने जिंकताना केवळ एक सामना गमावला होता. मात्र या कामगिरीचा विचार नव्या क्रमवारीसाठी करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच भारताचे अव्वल स्थान आॅस्टेÑलियाने घेतले आहे. या शानदार सत्रामध्ये भारताने आपल्या पाचही कसोटी मालिका जिंकताना आॅस्टेÑलिया आणि इंग्लंडलाही पराभूत केले होते.नव्या क्रमवारीमध्ये मे २०१९ नंतर खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे १०० टक्के, तर त्याच्या मागच्या दोन वर्षांच्या ५० टक्के कामगिरीचे मानांकन जोडले आहे. या नव्या क्रमवारीनुसार आॅस्टेÑलिया सर्वाधिक ११६ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला असून त्यानंतर न्यूझीलंड (११५) आणि भारत (११४) यांचा क्रमांक आहे. विशेष म्हणजे अव्वल तीन संघांमध्ये केवळ ३ गुणांचे अंतर असून २००३ सालापासून सुरू झालेल्या या क्रमवारी प्रणालीमध्ये केवळ दुसऱ्यांदाच असे झाले आहे की, अव्वल तीन संघांमध्ये इतके अंतर आहे. २०१६ सालीही अव्वल तीन संघांमध्ये एका गुणाचाच फरक होता. यामध्ये त्या वेळी, भारतीय संघ आॅस्टेÑलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तुलनेत केवळ एका गुणानेच पुढे होता. नव्या क्रमवारीत सर्वांत मोठा फटका द. आफ्रिकेला बसला आहे. त्यांना ८ गुणांचे नुकसान झाले असून ते आता श्रीलंकेहून मागे सहाव्या स्थानी घसरले आहेत. (वृत्तसंस्था)>इंग्लंड एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वलएकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत विश्वविजेत्या इंग्लंडने अव्वल स्थान कायम राखले असून भारतीय संघाने दुसरे स्थान मिळवले आहे. इंग्लंडचे १२७ गुण आहेत, तर भारतीय संघाने ११९ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. यानंतर न्यूझीलंड (११६) तिसºया व द. आफ्रिका (१०८) चौथ्या स्थानी आहे.>टी२० मध्येही कांगारूंचे वर्चस्व... टी२० क्रमवारीमध्येही आॅस्टेÑलियाने बाजी मारली. २०११ साली सुरू झालेल्या या क्रमवारीमध्ये आॅस्टेÑलियाने सर्वाधिक २७८ गुणांसह पहिल्यांदाच अव्वल स्थानी कब्जा केला आहे. पाकिस्तानने जानेवारी २०१८ साली न्यूझीलंडला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र आता २७ महिने अव्वल स्थानी राहिल्यानंतर पाकिस्तानची २६० गुणांसह चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंड २६८ गुणांसह दुसºया स्थानी असून २६६ गुणांसह भारतीय संघ तिसºया स्थानी आहे.>आयसीसी क्रमवारीकसोटी१. आॅस्टेÑलिया - ११६२. न्यूझीलंड - ११५३. भारत - ११४४. इंग्लंड - १०५५. श्रीलंका - ९१६. दक्षिण आफ्रिका - ९०७. पाकिस्तान - ८६८. वेस्ट इंडिज - ७९९. अफगाणिस्तान - ५७१०. बांगलादेश - ५५>एकदिवसीय१. इंग्लंड - १२७२. भारत - ११९३. न्यूझीलंड - ११६४. द. आफ्रिका - १०८५. आॅस्टेÑलिया - १०७६. पाकिस्तान - १०२७. बांगलादेश - ८८८. श्रीलंका - ८५९. वेस्ट इंडिज - ७६१०. अफगाणिस्तान - ५५>टी२०१. आॅस्टेÑलिया - २७८२. इंग्लंड - २६८३. भारत - २६६४. पाकिस्तान - २६०५. द. आफ्रिका - २५८६. न्यूझीलंड - २४२७. श्रीलंका - २३०८. बांगलादेश - २२९९. वेस्ट इंडिज - २२९१०. अफगाणिस्तान - २२८