भारतीय संघ मायदेशात खेळणार २१ सामने, बीसीसीआयची घोषणा

यादरम्यान डिसेंबर २०२१ ला भारतीय संघदेखील द. आफ्रिका दौरा करणार आहे. एप्रिल- मे २०२२ या कालावधीत आयपीएलचे आयोजन होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:18 AM2021-09-21T09:18:43+5:302021-09-21T09:19:59+5:30

whatsapp join usJoin us
Indian team to play 21 matches at home, BCCI announces | भारतीय संघ मायदेशात खेळणार २१ सामने, बीसीसीआयची घोषणा

भारतीय संघ मायदेशात खेळणार २१ सामने, बीसीसीआयची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर २०२१ ते जूृन २०२२ या कालावधीत मायदेशात चार कसोटी, तीन वन डे आणि १४ टी-२० असे २१ सामने खेळणार आहे. बीसीसीआयने पुढील आठ महिन्यात खेळल्या जाणाऱ्या वेळापत्रकाची सोमवारी घोषणा केली. यानुसार न्यूझीलंड नोव्हेंबर- डिसेंबरदरम्यान, वेस्ट इंडिज फेब्रुवारी २०२२ला, श्रीलंका फेब्रुवारी- मार्च २०२२ आणि द. आफ्रिका संघ जून २०२२ ला भारत दौऱ्यावर येतील.

यादरम्यान डिसेंबर २०२१ ला भारतीय संघदेखील द. आफ्रिका दौरा करणार आहे. एप्रिल- मे २०२२ या कालावधीत आयपीएलचे आयोजन होईल. भारताला न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-२० आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन व डे आणि पाच टी-२० सामने खेळायचे आहेत. श्रीलंका संघ भारत दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळेल. द. आफ्रिका संघाचा भारत दौरा केवळ दहा दिवसांचा असेल. या दौऱ्यात उभय संघात पाच टी-२० सामन्यांचे आयोजन होईल.

ऑस्ट्रेलियात आणखी एका टी-२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्यामुळे मायदेशामध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी १४ टी-२० सामने खेळविण्यावर जास्त भर दिला आहे.
 

Web Title: Indian team to play 21 matches at home, BCCI announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.