hanuma vihari news । नवी दिल्ली : भारतीय संघाचा खेळाडू हनुमा विवारी लवकरच पिता होणार आहे. तो पहिल्यांदाच पाल्याचा बाप होणार आहे. २९ वर्षीय खेळाडूच्या पत्नीने याबाबतची माहिती एक फोटो शेअर करून दिली. २०२२ मध्ये खराब फॉर्ममुळे त्याला भारताच्या कसोटी संघातून हटवण्यात आले. तेव्हापासून तो भारतीय संघापासून दूर आहे.
दरम्यान, क्रिकेटमधील सततच्या खराब फॉर्ममध्येच विहारीला लवकरच एक खुशखबर मिळणार आहे. भारतीय फलंदाजाने आपल्या पत्नीने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टवर दोन हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून विहारीची पत्नी प्रीतिराज गाडे हिने तिच्या मित्र आणि कुटुंबासह ही बातमी शेअर केली.
तिने पोस्टमध्ये लिहले, "हाय बेबी, अजून काही दिवस तिथेच थांब." तिने होणाऱ्या बाळाच्या वडिलांना अर्थात विहारीला टॅग केले आहे. विहारी सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठी JioCinema वर तेलगूमधून समालोचन करत आहे. हनुमा विहारीच्या पत्नीच्या पोस्टवर भारतीय खेळाडूंच्या पत्नींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन, सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी, अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपवकर यांचा समावेश आहे.
अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२२-२३ या वर्षासाठी भारतीय खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली. या करारामध्ये काही खेळाडूंचे प्रमोशन झाले आहे तर काहींचे डिमोशन झाले आहे. मात्र, या करारांमध्ये बदल केल्यामुळे हनुमा विहारीला या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे विहारीला ७-११ जून 2023 दरम्यान होणाऱ्या आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Indian team player Hanuma Vihari is going to be a father soon and his wife Preetiraj Gade shared this information
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.