कार अपघातानंतर रिषभ पंतचा 'पुनर्जन्म', भारतीय खेळाडूनं बदलली 'जन्मतारीख'

rishabh pant update : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कार अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:36 PM2023-06-28T19:36:05+5:302023-06-28T19:36:22+5:30

whatsapp join usJoin us
 Indian team player Rishabh Pant changed his date of birth to 5th January 2023 after a car accident   | कार अपघातानंतर रिषभ पंतचा 'पुनर्जन्म', भारतीय खेळाडूनं बदलली 'जन्मतारीख'

कार अपघातानंतर रिषभ पंतचा 'पुनर्जन्म', भारतीय खेळाडूनं बदलली 'जन्मतारीख'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकारअपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षाच्या अखेरीस झालेल्या भीषण अपघातात पंत गंभीर जखमी झाला अन् अद्याप क्रिकेटपासून दूरच आहे. सध्या तो विश्रांती घेत आहे. अपघातानंतर रिषभवर शस्त्रक्रियाही झाली. खरं तर अपघात झाल्यानंतर काही दिवस पंत शुद्धीत नव्हता. ५ जानेवारीला त्याला पूर्णपणे शुद्ध आली होती. म्हणूनच त्याने आता त्याची जन्मतारीख ५ जानेवारी अशी केली आहे. 

५ जानेवारीला पंतचा पुनर्जन्म
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने सोशल मीडियावर आपली जन्मतारीख बदलली असून ५ जानेवारी २०२३ अशी केली आहे. म्हणजेच कार अपघातातनंतर शुद्धीत नसलेला पंत जेव्हा शुद्धीत आला त्या दिवसाचा पंतने पुनर्जन्म असा उल्लेख केला आहे. 

दरम्यान, अपघातानंतर पंतवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही काळ त्याला स्वत:च्या पायावर उभे देखील राहता येत नव्हते. पण आता पंत वेगाने बरा होत असल्याचे दिसते. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. पंत आता जिममध्येही त्याच्या फिटनेसवर काम करत आहे.

रिषभ पंतचे आंतरराष्ट्रीय करिअर
२५ वर्षीय पंतने भारतासाठी आतापर्यंत ३३ कसोटी, ३० वन डे आणि ६६ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. पंतने कसोटीत ४३.७च्या सरासरीने २२७१ धावा, वन डेमध्ये ३४.६ च्या सरासरीने ८६५ धावा आणि ट्वेंटी-२० मध्ये २२.४ च्या सरासरीने ९८७ धावा केल्या आहेत.

Web Title:  Indian team player Rishabh Pant changed his date of birth to 5th January 2023 after a car accident  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.