ruturaj gaikwad marriage : आयपीएल २०२३ चा थरार संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकणार आहे. पुढील महिन्यात अर्थात जूनमध्ये मराठमोळ्या खेळाडूचे लग्न आहे. माहितीनुसार, ३-४ जून रोजी लग्न असल्याची माहिती ऋतुराजने बोर्डाला दिली आहे. त्यामुळे तो आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला मुकणार आहे.
ऋतुराजच्या होणाऱ्या बायकोचं नाव उत्कर्षा पवार असून ती कोण आहे याबाबत क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. खरं तर ऋतुराजचे अभिनेत्री सायली संजीवसोबत अफेयर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने आगामी WTC फायनलमधून माघार घेतली आहे, ज्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या ऋतुराज गायकवाडने बीसीसीआयला सांगितले की, त्याच्या लग्नामुळे तो या काळात उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे गायकवाडच्या अनुपस्थितीत यशस्वी राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
टीम इंडियात 'यशस्वी' एन्ट्री
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वी जैस्वालचा राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. ३-४ जून रोजी लग्न असल्याची माहिती ऋतुराजने बोर्डाला दिली आहे. संघ व्यवस्थापनाने यशस्वीला लाल चेंडूने सराव करण्यास सांगितले आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने आयपीएल २०२३ मधील १४ डावात ६२५ धावा केल्या होत्या.
मोठा ट्विस्ट! WTC फायनलसाठी जैस्वाल इंग्लंडला जाणार; ऋतुराज गायकवाडची माघार, जाणून घ्या कारण
कोण आहे उत्कर्षा पवार?
माहितीनुसार, ऋतुराजच्या होणाऱ्या बायकोचं संपूर्ण नाव उत्कर्षा अमर पवार असे आहे. २४ वर्षी उत्कर्षाचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ मध्ये पुण्यात झाला. तसेच ऋतुराज आणि उत्कर्षा मागील मोठ्या कालावधीपासून एकमेकांना ओळखत असल्याचे देखील बोलले जात आहे. मागील वर्षी उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती. मात्र, तरीदेखील ऋतुराजची होणारी बायको चाहत्यांसाठी एक मिस्ट्री गर्ल म्हणूनच राहिली आहे. कारण उत्कर्षा पवार सोशल मीडियावर सक्रिय नाही.
Web Title: Indian team player Ruturaj Gaikwad will marry Utkarsha Pawar after IPL 2023, know here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.