दुबई : भारताने मेलबर्न कसोटी जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटी) पुढील वर्षी होणाऱ्या फायनलमध्ये खेळण्याच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
भारताने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवीत ३० गुण प्राप्त केले. या विजयासह भारतीय संघ ३९० गुण व ७२.२ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीतील पराभव आणि षटकाची गती संथ ठेवल्यामुळे झालेल्या दंडानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे. त्यांचे ३२२ गुणांसह ७६.६ टक्के गुण आहेत. पाकिस्तानवरील १०१ धावाच्या विजयासह न्यूझीलंडने तिसऱ्या स्थानावर आपली स्थिती मजबूत केली आहे. या विजयासह न्यूझीलंडला ६० गुण मिळाले असून, त्यांचे ६६.७ टक्के गुण झाले आहेत.