ICC ODI World Cup schedule announce: टीम इंडिया ९ वेगवेगळ्या शहरांत खेळणार; जाणून घ्या कधी, कुठे व कुणाशी भिडणार

ICC ODI World Cup schedule announce: भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:39 PM2023-06-27T12:39:02+5:302023-06-27T12:39:37+5:30

whatsapp join usJoin us
Indian team schedule for World Cup 2023; India, Pakistan match-up confirmed for 2023 World Cup, know full fixture  | ICC ODI World Cup schedule announce: टीम इंडिया ९ वेगवेगळ्या शहरांत खेळणार; जाणून घ्या कधी, कुठे व कुणाशी भिडणार

ICC ODI World Cup schedule announce: टीम इंडिया ९ वेगवेगळ्या शहरांत खेळणार; जाणून घ्या कधी, कुठे व कुणाशी भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup schedule announce: भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आयसीसीने आज स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan) हा सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ असे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सामने झाले आणि सर्व भारताने जिंकले.  


मागच्या वेळेच जेवव्हा दोन्ही संघ समोरासमोर आले होते आणि तेव्हा भारताने ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या, त्यात रोहित शर्माने ११३ चेंडूंत १४० धावांची खेळी केली होती. पाकिस्तानला ६ बाद २१२ धावाच करता आल्या भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी मॅच जिंकली.  

भारतीय संघाचं वेळापत्रक 
८ ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली
१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद
१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर २, मुंबई
५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
११ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर १, बंगळुरू

Image

Web Title: Indian team schedule for World Cup 2023; India, Pakistan match-up confirmed for 2023 World Cup, know full fixture 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.