कोलंबो, दि. 24 - दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 231 धावांचा पाठलाग करताना भारताने 37 षटकांमध्ये सात विकेट्सच्या मोबदल्यात 181 धावा केल्या आहेत. एमएस धोनी (32) आणि भुवनेश्वर (17) धावांवर खेळत आहेत. भारताला विजयासाठी 60 चेंडूत 50 धावांची गरज आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दाणादाण उडाली आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अकिला धनंजयाने आपली जादू दाखवली. अकिला धनंजयाने भारतीच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले. अकिला धनंजयाने भारताच्या सहा गड्यांना बाद करत लंकेला विजयासाठीच्या आशा वाढवल्या आहेत.
शिखर-रोहित या सलामीवीरांनी 109 धावांची भागिदारी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. अकिला धनंजयाने सलामीवीर रोहित शर्माला बाद केल्यानंतर लोकेश राहुल, केदार जाधव आणि कर्णधार विराट कोहलीला त्याने तंबूचा रस्ता दाखवाला. पावसामुळे या सामन्यात भारताच्या डावातील 3 षटके कपात करण्यात आली. भारताला 47 षटकात 231 धावांचे आव्हान देण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. पण अर्धशतक केल्यानंतर रोहित शर्मा धनंजयाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर शिखर धवनने देखील मैदान सोडले. धवनचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकले. सिरिवंर्धनाने त्याला मॅथ्यूज करवी झेल बाद केले. लोकेश राहुल, केदार जाधव आणि कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर भारताची मदार पांड्यावर होती. मात्र पांड्यालाही धनजंयने बाद केले.
श्रीलंकेने 50 षटकात आठ बाद 236 धावा केल्या. श्रीलंकेकडून सिरीवरदनाने सर्वाधिक (58) धावांची अर्धशतकी खेळी केली. सिरीवरदना आणि कपुगेंदरामध्ये सातव्या विकेटसाठी झालेल्या 91 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.
कपुगेंदराने (40) धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार विकेट घेतल्या. यजुवेंद्र चहलने दोन तर, हार्दिक पांडया आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. पाल्लीकल येथे भारत आणि श्रीलंकेमध्ये दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. सलामीवीर डिकवेला (31), गुणतालिका (19) आणि उपुल थरंगा (9) धावांवर बाद झाले. बुमराहने डिकवेलाला (31) धवनकरवी झेलबाद केले तर, गुणतालिकाला (19) चहलच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टीचीत केले. हार्दिक पटेलच्या गोलंदाजीवर थरंगाने (9) स्लीपमध्ये कोहलीच्या हातात सोपा झेल दिला.
भारत आणि श्रीलंकेमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना होत असून, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटी मालिकेत ३-० ने ‘क्लीन स्विप’ करणा-या भारतीय संघाने पहिली वन डेदेखील नऊ गडी राखून सहज जिंकली होती.
Web Title: Indian team in the spin tie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.