नवी दिल्ली ।
भारतीय संघ फ्युचर टूर प्रोगाम (FTP) सायकल २०२४-३२ अंतर्गत दोनवेळा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय दोन्ही संघामध्ये होत आलेली ४ सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका आता ५ सामन्यांची होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तसंस्थेने याबाबात माहिती दिली आहे.
'दी एज'ने दिलेल्या वृत्तानसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ब्रॉडकास्टना सूचित केले आहे की त्यांनी पुढील FTP साठी ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंड आणि भारताचे दोन कसोटी दौरे निश्चित केले आहेत. ब्रॉडकास्टर्संना हे देखील सांगण्यात आले आहे की, भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियन संघ आता चार ऐवजी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
ICC च्या वार्षिक बैठकीनंतर होणार घोषणासध्याचे एफटीएल (FTL) २०१८ पासून सुरू झाले असून २०२३ मध्ये ५० षटकांच्या एकदिवसीय विश्वचषकासोबतच संपेल. लक्षणीय बाब म्हणजे भारतात आगामी वर्षात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. यानंतर सुरू होणाऱ्या पुढील FTP (२०२४-३२) ची घोषणा या महिन्यात २५-२६ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीनंतर केली जाणार आहे.
भारताचा सामना पाहण्याकडे प्रेक्षकांचा अधिक कल दरम्यान, ज्या हंगामामध्ये भारत किंवा इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत नाही तेव्हा स्टेडियम देखील खाली असल्याचे पाहायला मिळते. एकूणच भारताविरूद्ध सामना असल्यावर ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांचा कल अधिक असतो. या प्रमुख कारणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इंटरनॅशनल शेड्यूलमधील अस्थिरतेतील चढ-ऊतार संतुलित करण्यासाठी आगामी काही वर्षांच्या मॉडेलवर काम करण्यास सुरूवात केली आहे. अशी माहिती 'दी एज' या वृत्तसंस्थेने दिली आहे.