चॅम्पियन्स ट्रॉफी: भारतीय संघाची आज होणार घोषणा, स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य

राष्ट्रीय निवड समितीसह कर्णधार रोहित शर्माचीही यावेळी उपस्थिती राहील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 08:17 IST2025-01-18T06:06:55+5:302025-01-18T08:17:53+5:30

whatsapp join usJoin us
Indian team to be announced today, aims to perform strongly in the competition | चॅम्पियन्स ट्रॉफी: भारतीय संघाची आज होणार घोषणा, स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य

चॅम्पियन्स ट्रॉफी: भारतीय संघाची आज होणार घोषणा, स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्यालयात होणार आहे. राष्ट्रीय निवड समितीसह कर्णधार रोहित शर्माचीही यावेळी उपस्थिती राहील.

संघाची निवड झाल्यानंतर दुपारी १२:३० वाजता मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि रोहित हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीनंतर भारतीय संघापुढे आता मर्यादित षटकांच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे.

गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाकडून आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही विजेतेपद पटकावण्याची अपेक्षा होत आहे.

Web Title: Indian team to be announced today, aims to perform strongly in the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.