Join us  

भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध देणार सलामी, १९ वर्षांखालील महिला विश्वचषक सर्धा

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारतीय महिलांनी १९ वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 6:19 AM

Open in App

दुबई : पुढील वर्षी १८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मलेशिया येथे पार पडणाऱ्या महिलांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात गतविजेत्या भारताला सलामीला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करावे लागतील. अ गटात भारताला यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसोबत स्थान मिळाले आहे. 

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारतीय महिलांनी १९ वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरले होते. प्रत्येक गटातील संघ राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळणार आहे. त्यामुळे गटफेरीत प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन सामने खेळण्याची संधी आहे. चारही गटांतील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील.

सुपर सिक्स फेरीसाठी १२ संघांना दोन गटांत विभाजित करण्यात येईल. या दोन्ही गटांमधील अव्वल दोन संघ ३१ जानेवारीला उपांत्य सामना खेळतील. ३ फेब्रुवारीला विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडेल. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :भारतवेस्ट इंडिज