नवी दिल्ली ।
भारतीय संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे सहा वर्षांनंतर भारतीय संघ प्रथमच झिम्बाब्वेच्या धरतीवर खेळणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटने याबाबत अधिकृत माहिती देत दौऱ्याची घोषणा केली आहे. ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेचा संघ भारताशिवाय बांगलादेशविरूद्ध देखील मालिका खेळणार आहे. झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरूवात १८ ऑगस्टपासून होईल. २० तारखेला दुसरा तर २२ तारखेला तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाईल.
तब्बल ६ वर्षांनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर
भारतीय संघ शेवटच्या वेळी २०१६ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात संघाने ३ टी-२० सामने खेळले होते. भारतीय संघ सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे, यावेळी शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात असेल. भारताविरूद्ध मालिका खेळण्यापूर्वी झिम्बाब्वेचा संघ ३० जुलैपासून बांगलादेशविरूद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल.
भारत विरूद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका
पहिला सामना - १८ ऑगस्टदुसरा सामना - २० ऑगस्टतिसरा सामना - २२ ऑगस्ट
(वरील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १२.४५ पासून सुरू होतील).