Join us  

Sachin Tendulkar, women's U19 T20 World Champions: 'क्रिकेटच्या देवा'कडून होणार भारताच्या युवा 'वर्ल्ड चॅम्पियन्स'चा सन्मान

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी२० साठी U19 महिला संघ 'प्रमुख पाहुणे'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:34 AM

Open in App

Sachin Tendulkar, women's U19 World Champions: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना अहमदाबादमध्ये १ फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा असेल. सर्वप्रथम यामुळे मालिकेत कोण जिंकणार, याचा निर्णय होईल. सध्या ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे, सामना सुरू होण्यापूर्वी U19 महिला विश्वचषक विश्वविजेत्या खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. त्यातही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हा सामना पाहण्यासाठी त्यांना खास आमंत्रित करण्यात आले असून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर या वर्ल्ड चॅम्पियन्सचा सन्मान करणार आहे.

सामन्यासाठी विश्वविजेत्या १५ महिला खेळाडू येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत नुकताच १९ वर्षाखालील टी२० विश्वचषक झाला. तो विश्वचषक शफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जिंकला. BCCI सचिव जय शाह यांनी सर्वांना भारत-न्यूझीलंड तिसऱ्या  टी२०चा आनंद घेण्यासाठी मोटेरा येथे आमंत्रित केले आहे. या सोबतच या सर्वांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवर आपले म्हणणे मांडले. त्यांनी लिहिले की, “मला अतिशय आनंद होत आहे की भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि BCCIचे अधिकारी १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता भारताच्या विश्वविजेत्या U19 महिला संघाचा सत्कार करतील. नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांचा सन्मान केला जाईल." याआधी आणखी एका ट्विटमध्ये जय शाहांनी विश्वविजेत्यांना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या टी२० साठी आमंत्रित केले आहे.

--

भारताने इंग्लंडला हरवून जिंकला विश्वचषक!

शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करून पहिला ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक जिंकला. तसेच महिला क्रिकेटमधील भारताचे हे पहिले ICC विजेतेपद आहे. विजयी संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत पोहोचेल आणि त्यानंतर बुधवारी सत्कार समारंभासाठी अहमदाबादला जाईल. भारत आणि न्यूझीलंडच्या पुरुष संघांमधील तिसऱ्या आणि निर्णायक T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पार्श्वभूमीवर हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयसचिन तेंडुलकर
Open in App