मुंबई, वर्ल्ड कप २०१९ : क्रिकेट चाहते ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते, ती अखेरीस झाली. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप २०१९ स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत.
भारतीय संघाने 1983 आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. 2007 मध्ये भारताने ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही नावावर केला आहे. विशेष म्हणजे 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सात खेळाडू 2019च्या स्पर्धेतही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला.
भारतीय संघ शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा
भारताचे सामने ( वेळ सायंकाळी 3 वाजता) बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिकारविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलियागुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंडरविवार 16 जून 2019 : पाकिस्तानशनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तानगुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिजरविवार 30 जून 2019: इंग्लंड मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका
विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे
कोलकाताचे वृद्ध जोडपे दहावा विश्वचषक पाहण्यासाठी सज्ज
वर्ल्ड कपमध्ये भारताचा 'हा' गोलंदाज ठरेल प्रतिस्पर्धींसाठी घातक, तेंडुलकरला विश्वास
भारताच्या वर्ल्ड कप संघात धोनी कशाला हवा?
या रे या, सारे या... क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला फुटबॉल वर्ल्ड कपचं आमंत्रण