नागपूर : आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका वर्चस्वासह जिंकल्यामुळे भारतीय संघाच्या राखीव फळीची ताकद कळली. यातून भारतीय संघाचे भविष्यदेखील उज्ज्वल असल्याचे निष्पन्न होते, असे सलामीवीर रोहित शर्मा याने म्हटले आहे.मागील काही वर्षांतील भारताची ही सर्वांत बलाढ्य राखीव फळी आहे काय, असे विचारताच तो म्हणाला, ‘मी यावर भाष्य करणार नाही. मी मागच्या दहा वर्षांपासून संघात आहे. या संघाजवळ अनेक चांगले राखीव खेळाडू आहेत. ज्यांना संधी मिळाली त्यांनी संधीचे सोने केले. यावरून एक बाब स्पष्ट होते, की राखीव बाकावरील खेळाडूदेखील आव्हान पेलण्यास सज्ज असतात. आम्हाला नागपुरात यजुवेंद्रची उणीव जाणवली; पण अक्षर पटेलने ती भरून काढली.’ कठीण परिस्थितीतून बाहेर काढून संघाला विजय मिळवून देणाºया गोलंदाजांच्या कामगिरीचे रोहितने कौतुक केले.स्वत: शानदार फॉर्ममध्ये असलेला रोहित पुढे म्हणाला, ‘सलामीवीर म्हणून धावा काढणे ही माझी जबाबदारी आहे, मैदानावर जाऊन स्वाभाविक खेळ करणे सुरूच राहील. अजिंक्यच्या सोबतीने मुंबईसाठी वारंवार खेळल्याने सलामीला काय डावपेच आखायचे हे ठरविणे सोपे गेले, असेही रोहितने सांगितले. सर्वच गोलंदाज विकेट घेण्याच्या मानसिकतेने खेळले. मागील काही सामन्यांत साडेतीनशेवर धावा खेचणाºया आॅस्ट्रेलियाला २४२ धावांत रोखणे सोपे नव्हते; पण आमच्या गोलंदाजांनी हे काम करून दाखविले. प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी मात्र आम्हाला मोकळेपणाने फटकेबाजी करण्याची संधी दिली आहे.- रोहित शर्मा
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय संघाच्या राखीव फळीची ताकद वाढली : रोहित शर्मा
भारतीय संघाच्या राखीव फळीची ताकद वाढली : रोहित शर्मा
आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका वर्चस्वासह जिंकल्यामुळे भारतीय संघाच्या राखीव फळीची ताकद कळली. यातून भारतीय संघाचे भविष्यदेखील उज्ज्वल असल्याचे निष्पन्न होते, असे सलामीवीर रोहित शर्मा याने म्हटले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:50 AM