Join us  

एक नंबर...; विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटीत रचला मोठा विक्रम; सलग सहाव्या वर्षी मारली बाजी

मागील वर्षात भारतीय कसोटी संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली. २०२१मध्ये खेळल्या गेलेल्या १४ कसोटींपैकी भारतानं ८ जिंकल्या , तर प्रत्येकी ३-३ कसोटींत पराभव व अनिर्णीत असे निकाल लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 5:16 PM

Open in App

मागील वर्षात भारतीय कसोटी संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली. २०२१मध्ये खेळल्या गेलेल्या १४ कसोटींपैकी भारतानं ८ जिंकल्या , तर प्रत्येकी ३-३ कसोटींत पराभव व अनिर्णीत असे निकाल लागले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी लोळवले. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडचे वस्त्रहरण केले. त्यापाठोपाठ थेट इंग्लंडमध्ये जाऊन यजमानांना २-१ असे बॅकफूटवर फेकले आणि आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील मालिकेत १-० अशी आघाडी घेत वर्षाचा शेवट गोड केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभव वगळल्यास टीम इंडियाचे पारडे जड राहिले. भारतीय संघानं या कामगिरीच्या जोरावर मोठा विक्रम नोंदवला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत भारतानं १-० असा विजय मिळवला आणि त्याच जोरावर आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले. त्यानंतर आफ्रिका दौऱ्यावरील पहिलीच कसोटी जिंकून अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. भारतीय संघ १२४ रेटींग आणि ३४६५ गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. भारतानं सलग सहाव्यांदा वर्षाअखेरीस कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्याचा पराक्रम केला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२० व २०२१ या वर्षांच्या अखेरीस आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवलं. ( Indian test team ended as number 1 in Tests at the year end of 2016,2017,2018,2019,2020,2021 - 6th consecutive year) 

भारताची २०२१मधील कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

२०२१ च्या अखेरीस कसोटी क्रमवारी१ -  भारत - ३४६५ गुण, १२४ रेटिंग२- न्यूझीलंड -  ३०२१ गुण, १२१ रेटिंग३- ऑस्ट्रेलिया - १८४४ गुण, १०८ रेटिंग४- इंग्लंड - ३७५३ गुण, १०७ रेटिंग५- पाकिस्तान - २७८७ गुण, ९३ रेटिंग६ - दक्षिण आफ्रिका - १६७५ गुण, ८८ रेटिंग७- श्रीलंका - २४८५ गुण, ८३ रेटिंग८ - वेस्ट इंडिज - २४८० गुण, ७५ रेटिंग९ - बांगलादेश - ८९६ गुण, ४७ रेटिंग

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयसीसीविराट कोहली
Open in App