ICC vs Indian Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final-2023) चा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या काही दिवस आधी आयसीसी एका भारतीय अंपायरला कठोर शिक्षा देण्याची तयारी करत आहे.
'या' पंचावर भ्रष्टाचाराचे आरोप
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी भटिंडाचे पंच जतीन कश्यप यांच्यावर गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या चौकशीनंतर भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. आयसीसीने त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत कश्यपवर आरोप लावण्यात आलेल्या घटनांचा तपशील दिलेला नाही. कश्यपने पंजाबमधील जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये काम पाहिले होते पण ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पॅनेलवर नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये अंपायरिंग
कश्यप यांनी गेल्या चार वर्षांपासून जिल्हास्तरीय सामन्यांमध्येही अंपायरिंग केली नाही आणि आयसीसीने पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए) कडून माहिती मागवण्यापूर्वी बराच काळ राज्य क्रिकेटच्या अंपायरिंग सर्किटमध्ये त्यांची उपस्थिती नव्हती. कश्यप यांच्यावर आयसीसी संहितेच्या अंतर्गत संभाव्य भ्रष्ट वर्तनाच्या ACU तपासात सहकार्य करण्यास वाजवी कारणाशिवाय अयशस्वी झाल्याचा किंवा नकार दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तपासाचा भाग म्हणून ACU द्वारे विनंती केलेली कोणतीही माहिती आणि/किंवा दस्तऐवज अचूकपणे आणि पूर्णपणे प्रदान करण्यात अयशस्वी झाले असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पंजाब क्रिकेटशी काहीही संबंध नाही
देण्यात आलेल्या माहितीनुसार, यामध्ये कोणतेही दस्तऐवज किंवा इतर माहिती लपवणे, छेडछाड करणे किंवा नष्ट करणे यांचा समावेश असून शकतो, जे त्या तपासाशी संबंधित असू शकते आणि/किंवा जे कोड अंतर्गत भ्रष्ट वर्तनाच्या पुराव्याच्या शोधाचा पुरावा असू शकते. तथापि, पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (पीसीए) सचिव दिलशेर खन्ना म्हणाले की, कश्यपवरील आयसीसीच्या आरोपांचा राज्यातील खेळाशी काहीही संबंध नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या चौकशीनंतर कश्यपवर आरोप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपांवर उत्तर देण्यासाठी आयसीसीने कश्यपला १४ दिवसांची मुदत दिली आहे.