Join us

MS धोनीचा प्रभाव! युवा भारतीय विकेट किपरनं दाखवलं थाला मॅजिक (VIDEO)

भारतीय युवा विकेट किपरचा तोरा बघून समालोचकाला आठवला MS धोनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 17:03 IST

Open in App

Harvansh Singh replicates MS Dhoni No Look run-out Style  युएईच्या मैदानात सुरु असलेल्या १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत युवा भारतीय खेळाडू आपल्यातील धमक दाखवून देताना दिसत आहे. कर्णधार मोहम्मद अमान यानं भारतीय संघाकडून स्पर्धेतील पहिलं शतक ठोकत लक्ष वेधून घेतलं. याशिवाय आयुष म्हात्रे हा सलामीवीर सलग दोन अर्धशतकासह बॉलिंगमधील क्षमता दाखवून आपल्यातील प्रतिभा दाखवून देताना दिसतोय. याशिवाय आयपीएलमधील करोडपती वैभव सूर्यंवशीही लक्षवेधी ठरतोय. यात आता भारतीय संघाचा युवा विकेट किपर हरवंश सिंगनं फिल्डवर धोनीची स्टाईल मारत लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.  

भारतीय विकेट किपर अन् MS धोनीचा प्रभाव  

MS

हरवंश सिंग हा विकेटमागील कामगिरीशिवाय बॅटिंगच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. युवराज सिंगप्रमाणे मॅच विनर होण्याच स्वप्न बाळगणाऱ्या या क्रिकेटरनं युएई विरुद्धच्या सामन्यात थाला मॅजिकचा खास नजराणा पेश केला. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा विकेटमागील चपळतेसाठीही ओळखला जातो. स्टंपकडे न पाहता अचूक नेम साधण्याची त्याची स्टाईल अनेकदा पाहायला मिळाली. त्याचा हा अंदाज अनेकदा पंतनंही कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता हरवंश सिंगची भर पडलीये. 

युवा विकेट किपरचा अंदाज होता बघण्याजोगा, कॉमेंट्री करणाऱ्यालाही आठवला धोनी

भारत आणि युएई यांच्यातील सामना शारजाह मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात युएईच्या संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. भारतीय गोलंदाजीसमोर या संघातील फलंदाजांचा निभाव लागला नाही. अख्खा संघ अवघ्या १३७ धावांत ऑल आउट झाला. यात विकेमागे हरवंश सिंग याने ३ कॅच घेतले. याशिवाय त्याने युएईच्या फलंदाजाला धोनीच्या अंदाजात रन आउट करण्याचा प्रयत्नही केला. स्टंपकडे न बघता त्याने धोनीप्रमाणेच अगदी अचून निशाणा साधला. पण खेळाडू क्रिजमध्ये सेफ पोहचला होता. भारतीय संघाला विकेट  मिळाली नसली तरी थाला मॅजिकमुळे  हरवंश सिंगचा अंदाज चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.    

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमहेंद्रसिंग धोनीरिषभ पंतभारतीय क्रिकेट संघएशिया कप 2023